शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा लेखणीबंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:22 IST

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत जिल्हा परिषदेतील पाच कर्मचारी निलंबित करण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गनिहाय कर्मचारी संघटना एकवटल्या असून, आज मंगळवारी सायंकाळी कर्मचा-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत जिल्हा परिषदेतील पाच कर्मचारी निलंबित करण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गनिहाय कर्मचारी संघटना एकवटल्या असून, आज मंगळवारी सायंकाळी कर्मचा-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. या कर्मचा-यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अन्यथा ६ एप्रिलपासून कर्मचारी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.बांधकाम विभागातील सहायक लेखाधिकारी ए.ए. खान, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ए.डी. गावंडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ए.डी. साबळे, शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव कळम पाटील, आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी एच.एस. कोलमवाड या पाच जणांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी निलंबित केले. याव्यतिरिक्त सामान्य प्रशासन विभागातील आणखी चार कर्मचारी ‘सीईओं’च्या रडारवर आहेत. यासंबंधीची जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. काल सोमवारी सर्व कर्मचारी संघटनांनी जि.प. उद्यानात बैठक घेऊन प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. आज मंगळवारी जि.प. मुख्यालयातील सर्व कर्मचा-यांच्या स्वाक्षरी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय व सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांना मागण्यांचे निवेदन दिले.प्रशासनाने केलेली निलंबनाची कारवाई ही अन्यायकारक आहे. महाराष्ट्र शिस्त व अपील नियमावलीनुसार निलंबनाची ही कारवाई समर्थनीय नाही. कर्मचा-यास बडतर्फ, सक्तीने सेवानिवृत्ती, सेवेतून काढून टाकण्यासारखी परिस्थिती घडल्यास संबंधित कर्मचाºयांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. निलंबित करण्यात आलेल्या पाचही कर्मचा-यांची प्रकरणे गंभीर स्वरूपाची नाहीत. त्यामुळे या कर्मचा-यांचे निलंबन समर्थनीय ठरू शकत नाही. निलंबन कारवाईच्या आदेशाने पुनर्विलोकन करण्यात यावे. ज्यामुळे कर्मचा-यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होणार नाही किंवा कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही.अन्यथा ६ एप्रिलपासून प्रशासनाविरुद्ध असहकार पुकारून लेखणीबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रदीप राठोड, सुरेश गायकवाड, बाबासाहेब काळे, संजीव कळम पाटील आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद