शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

आत्महत्या थांबविण्यासाठी भावनिक, आर्थिक साहाय्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 7:04 PM

कोरोना, लॉकडाऊन काळात ज्या आत्महत्या झाल्या, त्यातील बहुसंख्य आत्महत्या या आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे झाल्या आहेत.

ठळक मुद्देआत्महत्या करण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी आता अनेकांसाठी जीवघेणी ठरते आहे. मागील दीड वर्षापासून सुरू असलेले हे लॉक-अनलॉकचे सत्र आणि त्यामुळे थांबलेले आर्थिक चक्र अनेक आत्महत्यांना कारणीभूत ठरले आहे. म्हणूनच आत्महत्या थांबवायच्या असतील तर सगळ्यात आधी मानसिक आणि आर्थिक दृष्टीने कमकुवत असणाऱ्या व्यक्तींना आधार द्या, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञ करत आहेत.

कोरोना, लॉकडाऊन काळात ज्या आत्महत्या झाल्या, त्यातील बहुसंख्य आत्महत्या या आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे झाल्या आहेत. या काळात वाढलेले कौटुंबिक कलह, विविध कारणांमुळे आलेला एकटेपणाही आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे. म्हणूनच आपल्या घरात, मित्रपरिवारात जर अशा नैराश्य आलेल्या व्यक्ती असतील, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. मानसिक, भावनिक व आर्थिक स्तरावरही त्यांना जमेल तसा आधार द्या आणि सगळ्यात आधी बदललेल्या वाईट परिस्थितीला त्या व्यक्ती जबाबदार आहेत, असे त्यांना दूषण देणे थांबवा, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मागील २० वर्षाच्या तुलनेत या दिड वर्षात आत्महत्या होण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. हे मानसोपचार तज्ज्ञांसमोरचे मोठे आव्हान आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार दरदिवशी ३९ तरुण आणि २८ विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. हा मागील २५ वर्षांमधील सगळ्यात मोठा आकडा आहे. कोरोनामुळे प्रत्येकाची वाढलेली चिंता छातीत दुखणे, जीव घाबरणे, डोकेदुखी, निद्रानाश, नैराश्य, श्वास घ्यायला त्रास होणे, आपल्याच विचारात गुंग राहणे, असे अनेक आजार निर्माण करणारी ठरत आहे. ज्या व्यक्ती नैराश्याने त्रस्त आहेत त्यांनी लहान मुलांसोबत वेळ घालवावा, सकारात्मक गोष्टी पहाव्यात, ऐकाव्यात आणि हा काळ लवकरच निघून जाईल, असे म्हणत स्वत:ला हिंमत देण्याचा प्रयत्न करावा.- डॉ. रश्मिन आचलिया, मानसोपचारतज्ज्ञ

कुटुंबाने घ्यावी काळजी१. आपल्या कुटुंबातील व्यक्ती सध्या कोणत्या त्रासातून जात आहे, हे कुटुंबाला चांगल्याप्रकारे माहीत असते. त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिकता समजून घ्या. त्याच्याशी विविध विषयांवर संवाद साधून त्याला बोलते करा.२. घरात पैसा नसेल तर निश्चितच अनेक अडचणी उद्भवतात. पण असेल तेवढ्यात भागवू असे म्हणून रोजगार गेलेल्या व्यक्तीला भावनिक आधार द्या.३. सगळे जगच थोड्याफार फरकाने या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे हा काळही बदलेल, असे वारंवार सांगून नैराश्यग्रस्त व्यक्तीला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करा.४. आर्थिक आणि मानसिकदृष्टीने खचलेल्या व्यक्तींना शक्यतो एकटे सोडू नका. मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन त्यांचे समुपदेशन करून घ्या. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य