शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एम्ब्रॅकोचा शेंद्र्यात १ हजार कोटींचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:37 IST

दरवर्षी ६० लाख कॉम्प्रेसर उत्पादनाचे लक्ष्य; २०२६ पर्यंत उत्पादनात, थेट १ हजार रोजगार मिळणार

छत्रपती संभाजीनगर : जागतिक रेफ्रिजरेशन क्षेत्रातील आघाडीच्या 'एम्ब्रॅको' ('निदेक ग्लोबल अप्लायन्स' समूहाचा भाग) कंपनीने ऑरिक सिटीच्या शेंद्रा इंडस्ट्रीयल झोनमध्ये तब्बल १ हजार २९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. कंपनी येथे अत्याधुनिक कॉम्प्रेसर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. २०२६ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची कंपनीची योजना आहे. ७५० ते १००० जणांना थेट रोजगार मिळणार असल्याची घोषणा कंपनीने केली.

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर (डीएमआयसी)मध्ये गतवर्षीपासून विविध बहुराष्ट्रीय कंपन्या दाखल होत आहेत. गतवर्षी ५४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प येथे येत आहेत. आता येथील औद्याेगिक विश्वाला नवे बळ देणाऱ्या एम्ब्रॅको कंपनीने १ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. ऑरिक शेंद्रा येथे कंपनी ५० एकरवर हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून दरवर्षी ६० लाख कॉम्प्रेसर युनिट्सचे उत्पादन करण्याचा कंपनीचा मानस आहे. घरगुती, तसेच व्यावसायिक फ्रीजसाठी हे युनिटस् असतील. त्यासोबत ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टरचेही उत्पादन येथे होईल.

दीड महिन्यांपूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहिली जमीनकंपनीचे अधिकारी दीड महिन्यापूर्वी शहरात आले होते. त्यांनी शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीला भेट दिली. ऑरिक शेंद्रा येथील ५० एकरचा भूखंड दाखविण्यात आला. आता या भूखंडावर प्रकल्प उभारण्याची घोषणा केली.

मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणारा प्रकल्पदिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बिडकीन इंडस्ट्रीयल झोनमध्ये टोयोटा-किर्लोस्कर मोटार्स, जेएसडब्ल्यू, एथर एनर्जी, ल्युब्रिझोल यासह पिरॅमल फार्मा या कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. शिवाय वाळूज इंडस्ट्री ऑटो हब म्हणून ओळखली जाते. जालना येथे सीड आणि स्टील इंडस्ट्रीज चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. आता एम्ब्रॅको कंपनी काँप्रेसरचा प्रकल्प उभारत असल्याने शहर जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या प्रकल्पामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नव्याने मोठ्या संधी उपलब्ध होतील.- उत्सव माछर, उपाध्यक्ष सीएमआयए

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShendra MIDCशेंद्रा एमआयडीसीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर