शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोने बँकेत ठेवून अपहार; फरार अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी वेशांतर करून पकडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 19:43 IST

११ आरोपींनी निशांत को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट सोने गहाण ठेवून लाखो रुपयांचा अपहार केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपींविरोधात वेदांतनगर ठाण्यात गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता.

ठळक मुद्देआरोपीविरोधात औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात लुटमारीचे अनेक गुन्हे

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरातील निशांत को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीविरोधात औरंगाबादसह जालना आणि बीड जिल्ह्यात जबरी चोरी आणि लुटमारीचे १० गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. सतीश ऊर्फ संतोष बाबूराव नाईक (३१, रा. गुरुजन सोसायटी, रोपळेकर चौक), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी सतीश ऊर्फ संतोष नाईकसह ११ आरोपींनी निशांत को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट सोने गहाण ठेवून लाखो रुपयांचा अपहार केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपींविरोधात वेदांतनगर ठाण्यात गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आरोपी पसार झाला होता. दीड वर्षापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो सापडत नव्हता. दरम्यान, तो गुरुजन सोसायटीत राहत असल्याची माहिती खबऱ्याने वेदांतनगर पोलिसांना दिली.

पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देवकते, हवालदार सचिन संपाळ आणि सनगाळे यांनी वेशांतर करून मंगळवारी त्याला शिताफीने पकडले. आरोपी सतीश ऊर्फ संतोषविरोधात शहरातील सिटीचौक, क्रांतीचौक, सिडको, जिन्सी, जवाहरनगर, सातारा, जालना येथील सदर बाजार ठाणे, तालुका पोलीस ठाणे, बीड येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद