खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या १० नंबरच्या 'विश्वकर्मा' लेणीमध्ये आज (सोमवारी) भगवान बुद्धांच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक झाला. सूर्य उत्तरायणाला जात असताना घडणारा हा 'किरणोत्सव' सोहळा पर्यटकांनी डोळे भरून अनुभवला. मात्र, उद्या १० मार्च रोजी मुख्य किरणोत्सव असूनही मंगळवारच्या साप्ताहिक सुटीमुळे लेणी बंद राहणार आहे. परिणामी, यंदा मुख्य सोहळ्याला पर्यटकांना मुकावे लागणार आहे.
स्थापत्यकलेचा अद्वितीय चमत्कारवेरूळमध्ये एकूण ३४ लेण्या असून त्यापैकी १२ बौद्ध लेण्या आहेत. १० क्रमांकाची लेणी ही 'चैत्य' असून तिला 'सुतार की झोपडी' किंवा 'विश्वकर्मा मंदिर' म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी १० मार्चच्या सुमारास सूर्यकिरणे थेट भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पडतात. यंदा ९ आणि ११ मार्च रोजी हा सोहळा काही प्रमाणात पाहता येईल, मात्र १० मार्चचा पूर्ण सोहळा पाहता येणार नाही.
धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वया लेणीत भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बसलेले दिसतात. त्यांच्या उजव्या बाजूला बोधिसत्व पद्मपाणी आणि डाव्या बाजूला बोधिसत्व वज्रपाणी यांच्या मूर्ती आहेत. गेल्या सहा-सात वर्षांपासून या किरणोत्सवाचे महत्त्व अधिक वाढले असून, हा नजारा टीपण्यासाठी इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने वेरूळमध्ये दाखल होत आहेत.
Web Summary : The 'Kirnotsav' at Ellora's Cave 10, featuring sun rays on Buddha, began. Tourists witnessed the spectacle. However, the main event on March 10th coincides with the weekly closure, preventing public viewing. Partial viewing possible on the 9th and 11th.
Web Summary : एलोरा की गुफा 10 में 'किरणोत्सव' शुरू हो गया, जिसमें बुद्ध पर सूर्य की किरणें पड़ रही हैं। पर्यटकों ने इस दृश्य को देखा। हालाँकि, 10 मार्च को मुख्य कार्यक्रम साप्ताहिक बंदी के साथ है, जिससे सार्वजनिक प्रदर्शन बाधित होगा। 9 और 11 को आंशिक प्रदर्शन संभव है।