शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ-अजिंठा महोत्सव टांगणीला; पैशांची जुळवाजुळव होत नसल्यामुळे ठरेना तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:19 IST

आजवर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात महोत्सवाचे आयोजन केले गेले. यंदा मात्र महोत्सव लांबला आहे.

छत्रपती संभाजीनगर : यंदाचा वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव पैशांची जुळवाजुळव होत नसल्यामुळे टांगणीला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महोत्सव होईल, असे नियोजन हेाते. मात्र, सध्या महोत्सव आयाेजनाबाबत काहीही हालचाली नसल्यामुळे महोत्सव होण्याबाबत साशंकता आहे. मागच्या वर्षीची थकबाकी व यंदाचा खर्च मिळून सहा ते आठ कोटी रुपयांचा निधी महोत्सवासाठी उभा करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे.

आजवर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात महोत्सवाचे आयोजन केले गेले. यंदा मात्र महोत्सव लांबला आहे. दोन ते तीन बैठका झाल्या. निधी उभारण्यावर बैठकीत खल झाला. मागील देणे आणि यंदाचा खर्च याबाबत काहीही मेळ बसत नसल्यामुळे यंदाचा महोत्सव होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. यंदाच्या महोत्सवासाठी म्हणून सुमारे साडेसहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका व पर्यटन विभागाकडून काही निधी मिळेल, तर उर्वरित निधीसाठी शासनाकडे मागणी करणे तसेच कंपन्यांच्या सीएसआर फंड मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रयत्न सुरू आहेत. मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे, तरीही महोत्सवाच्या आयोजनाबाबत ठोस निर्णय झालेला नाही. पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वाचा आहे.

१.७५ कोटींचे देणे बाकी...गेल्यावर्षीचे १ कोटी ८५ लाख रुपये देणे बाकी आहे. त्यात विद्युत रोषणाई, डेकोरेशन व इतर बिलांचा समावेश आहे.

१९८५ पासून महोत्सवाला सुरुवातजिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १९८५ साली वेरुळ येथील कैलास लेणी समोरील महोत्सव आयोजित करण्यास सुरूवात केली होती. या महोत्सवाचे रूपांतर २००२ पासून वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सोनेरी महलात भरविण्यात येऊ लागला. २४ वर्षांत १४ वेळा महोत्सवाला खंड पडला.

आता महोत्सव लेण्यांच्या पायथ्याशी...सोनेरी महल परिसरात महोत्सव भरविण्यास न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगिती आली आहे. त्यामुळे यावर्षीचा महोत्सव वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी दोन दिवस आणि. एक दिवस शहरात घेण्याचा निर्णय झाला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर