शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्राहक न्यायालय इमारत बांधकामाच्या पात्र निविदा दाबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 20:24 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने लॉकडाऊननंतर मिशन बिगिनमध्ये या कामासाठी निविदा मागविल्या.

ठळक मुद्देसर्व निविदा उघडल्यास शासनाच्या फायद्याची शक्यताआजवरच्या निविदा १० ते १५ टक्के कमी दराने मंजूर करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : जिल्हा ग्राहक न्यायालयाची नवीन इमारत जालना रोडवरील शासकीय दूध डेअरीलगतच्या जागेत बांधणे प्रस्तावित आहे. ७ कोटी १९ लाख रुपयांतून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीच्या कामासाठी आलेल्या १० पैकी ४ निविदाच उघडण्यात आल्यामुळे घोळ सुरू असल्याच्या तक्रारी सुरू  झाल्या आहेत. या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवर केली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने लॉकडाऊननंतर मिशन बिगिनमध्ये या कामासाठी निविदा मागविल्या. त्यात सगळ्या निविदा पात्र असल्यामुळे कमी आणि जास्त दराची कोणती निविदा आहे, हे सर्व निविदा उघडल्यानंतरच समजले असते; परंतु राजकीय दबावापुढे बांधकाम विभागाने नांग्या टाकत १.५ टक्के कमी दराने आलेली निविदा अंतिम केली. उर्वरित निविदा यापेक्षा जास्त कमी दराने आलेल्या असतील; परंतु त्या उघडून न पाहताच बांधकाम विभागाने सगळे सोपस्कार आटोपण्याचा घाट घातला. 

१ सप्टेंबर २०२० रोजी १० कंत्राटदारांनी या कामासाठी निविदा दाखल केली. त्यानंतर ऑनलाईन निविदा उघडण्यासाठी कंत्राटदार गैरहजर राहिल्याचे कारण पुढे करून विभागाने सर्व निविदा उडल्या नाहीत. त्यानंतर ४ पैकी ६ कंत्राटदारांना बांधकाम विभागाने  निविदा अपात्र असल्याने उघडल्या नाहीत, असे कळविले. २०१८ च्या शासन अध्यादेशानुसार सर्व निविदा उघडणे बंधनकारक आहे; परंतु त्या अध्यादेशाची पायमल्ली करीत हायटेक इन्फ्रा या कंत्राटदाराची निविदा १.१० टक्के कमी दराने मंजूर केली. आजवरच्या निविदा १० ते १५ टक्के कमी दराने मंजूर करण्यात आल्या आहेत. ७ कोटी १९ लाख रुपये कामासाठी आलेल्या सर्व निविदा उघडल्या असत्या, तर १० कमी टक्के दराच्या आसपास इतर निविदा असत्या, तर शासनाचे किमान ७० लाख ते १ कोटी रुपये वाचले असते. याप्रकरणी चौकशी करून सर्व १० निविदा उघडण्यात याव्यात, अशी मागणी बांधकाम खात्याच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.मुख्य अभियंत्यांनी सांगितले की...मुख्य अभियंता डी.डी. उकिर्डे यांना याप्रकरणी विचारले असता त्यांनी सांगितले, अधीक्षक अभियंत्यांकडे याबाबत निर्णय झाला आहे. निविदेचे काही टप्पे ठरलेले आहेत. त्यानुसार त्यांनी निविदा उघडल्या आहेत. मंजुरीनंतर त्या माझ्या अखत्यारीत येतात. माझ्याकडे आल्यानंतर पाहता येईल, नेमका काय प्रकार आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfundsनिधी