शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

'अकरावी शहरात, तर बारावी खेड्यात'; आता विनाकारण महाविद्यालय बदलण्यास बसणार चाप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 15:55 IST

मागील काही वर्षांपासून बारावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा ग्रामीण भागाकडे वाढला आहे.

ठळक मुद्देशहरातील मुलांना ग्रामीणमध्ये प्रवेश घेताना द्यावे लागणार ठोस कारण तळ्यात-मळ्यात करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणार अडचणी

औरंगाबाद : टक्केवारी मिळणे, कॉपी करण्याच्या आशेमुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी झाल्यानंतर बारावीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असतो. यात अनेक अडचणीही निर्माण होतात. या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने ही प्रक्रिया महाविद्यालय पातळीवर पूर्ण करण्याची परवानगी देतानाच ठोस कारणाशिवाय अकरावीच्या विद्यार्थ्यास टीसी देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. 

मागील काही वर्षांपासून बारावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा ग्रामीण भागाकडे वाढला आहे. मात्र, २०२०-२१ या नवीन शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये व जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे; परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना ठोस कारण द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून काही ठोस कारणे असतील तरच विद्यार्थ्यांना कॉलेज बदलता येईल, असे सांगितले आहे. त्यामध्ये सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे,  शाखा बदलून मिळणे, विद्यार्थ्याचा राहण्याचा पत्ता बदलणे, इयत्ता बारावीमध्ये विद्यार्थ्यास बोर्ड बदलायचे असल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतून दाखला दिला जाईल. मात्र, त्यासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या डेटाबेसमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही महाविद्यालयांनी करणे आवश्यक असल्याचेही राज्य शासनाने शिक्षण विभागाला पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून कार्यवाहीबारावीत उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी विविध कारणास्तव बारावीत कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत आॅनलाईन प्रक्रिया पार पाडावी लागत होती. मात्र, यंदापासून महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद