औरंगाबाद : घरातील पडद्याशी खेळत असताना गळफास बसून ११ वर्षीय मुलाचा अंत झाल्याची घटना बीड बायपास परिसरातील बंबाटनगरात सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.ऋषिकेश सुनील राख (११, रा. बंबाटनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, बंबाटनगर येथे सुनील राख हे कुु टुंबासह राहतात. ते खाजगी कंपनीत नोकरी करतात. सोमवारी रात्री ते कामावर होते. रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी स्वयंपाक घरात काम करीत होती, तर त्यांचा मुलगा ऋषिकेश दरवाजाच्या पडद्यासोबत खेळत होता. यावेळी खेळताना त्याने पडदा गळ्याभोवती गुंडाळून घेतला. यामुळे त्याच्या गळ्याला फास लागून तो बेशुद्ध पडला. बराच वेळ झाला तरी ऋषिकेशचा आवाज येत नसल्याचे पाहून त्याची आई स्वयंपाक खोलीतून बाहेर आली. त्यावेळी त्यांना ऋषिकेशच्या गळ्याभोवती पडदा गुंडाळल्याने त्यास फास लागल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ फास सोडविला आणि बेशुद्धावस्थेत रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास ऋषिकेशला घाटीत दाखल केले. तेथील डॉक्टरांनी ऋषिकेशला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ऋषिकेश हा पाचवीत शिकत होता. त्याला एक बहीण आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पडद्यासोबत खेळताना गळफास बसून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:57 IST
घरातील पडद्याशी खेळत असताना गळफास बसून ११ वर्षीय मुलाचा अंत झाल्याची घटना बीड बायपास परिसरातील बंबाटनगरात सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पडद्यासोबत खेळताना गळफास बसून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू
ठळक मुद्देबायपास परिसरातील बंबाटनगरमधील घटना