शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

इलेक्ट्रॉनिक वस्तू ‘आॅनलाईन’वर प्रचंड स्वस्त; शोरूम खरेदीत ग्राहकांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 12:18 IST

टीव्हीसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या औरंगाबादेतील विविध शोरूम्समधील किमती आणि अ‍ॅमेझॉनसारख्या आॅनलाईन पोर्टलवरील किमतीत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देऑनलाईन खरेदीकडे ग्राहक आकर्षित टीव्ही, फ्रीज खरेदीसाठी ‘आॅनलाईन’कडे ग्राहकांचा कल शहरातील सानिया डिस्ट्रिब्युटर्स, अरुण इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅमेझॉन यांच्या किमतींत मोठी तफावत

औैरंगाबाद : टीव्हीसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या औरंगाबादेतील विविध शोरूम्समधील किमती आणि अ‍ॅमेझॉनसारख्या आॅनलाईन पोर्टलवरील किमतीत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. एकाच कंपनीच्या एकाच मॉडलेची किंमत वेगवेगळ्या शोरूममध्ये वेगवेगळी आकारली जात आहे, तर दुसरीकडे आॅनलाईनमध्ये ती वस्तू स्वस्तात मिळत आहे. यामुळे स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स शोरूमकडून आपली दिशाभूल होत असल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण होत आहे. 

या परिस्थितीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी ग्राहक आता आॅनलाईन खरेदीकडे वळत असल्याचे दिसते. आमच्या प्रतिनिधीने शहरातील सानिया डिस्ट्रिब्युटर्स व अरुण इलेक्ट्रॉनिक्स या शोरूममधील  किमती तसेच अ‍ॅमेझॉनवर आॅनलाईन विक्री होणाऱ्या  टीव्ही, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हनच्या काही मॉडेल्सची  किंमत जाणून घेतली. यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले. 

अनेक नागरिक आॅनलाईन खरेदीसाठी प्राधान्य देत असल्याच्या कारणांचा शोध घेतला असता डीलर प्राईस म्हणून एमआरपीपेक्षा कितीतरी कमी किमतीत कंपन्या विक्रेत्यांना वस्तू देतात. मात्र, तो फायदा हे विक्रेते ग्राहकांना देत नाहीत, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. जे विक्रेते कंपनीने दिलेले विक्री उद्दिष्ट पूर्ण करतात त्यांना कंपनीकडून इतरांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू दिल्या जातात. मात्र, त्याचाही फायदा ग्राहकांना दिला जात नाही. ही कारणे आता ग्राहकांना कळू लागल्याने ग्राहक थेट आॅनलाईन खरेदीकडे वळत आहेत. आॅनलाईन खरेदी केल्यानंतर जर तुम्हाला वस्तू आवडली नाही, तर कंपनी ती परत घेते व सर्व रक्कम वापस करते, अशी सुविधा दुकानदारांकडे नाही. यामुळे बहुतांश नागरिक आता आॅनलाईन वस्तू खरेदीवरच भर देत आहेत.

सानिया डिस्ट्रिब्युटर्स महागडेचइलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती दुसऱ्या शोरूममध्ये कशा स्वरूपाच्या आहेत याची आमच्या प्रतिनिधीने पडताळणी केली. सानिया डिस्ट्रिब्युटर्सकडे एलजीच्या स्मार्ट टीव्ही (मॉडेल: ४९ यूजे ६३२ टी)ची किंमत ७६ हजार ९५० रुपये इतकी सांगण्यात आली. याच मॉडेलची अ‍ॅमेझॉनवरील आॅनलाईन विक्री किंमत ६४ हजार ४९० रुपये आहे. सानिया डिस्ट्रिब्युटर्समध्ये खरेदी केल्यास ग्राहकाचे तब्बल साडेबारा हजार रुपये नुकसान होण्याची शक्यता आहे. एलजीच्याच ५७३ डी या एलईडी टीव्हीची आॅनलाईन किंमत केवळ २२ हजार ९०० रुपये आहे. मात्र, याच टीव्हीची  सानिया डिस्ट्रिब्युटर्स येथे ३२ हजार ४९० रुपये इतकी किंमत सांगण्यात आली. या किमतीत ९,५९० रुपयांची तफावत दिसून आली. ही सामान्य ग्राहकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.

अरुण इलेक्ट्रॉनिक्समधील वस्तूंचे भाव चढेचएलजी कंपनीच्या जे ६१६ या ३२ इंची टीव्हीची औरंगाबादमधील सिडकोतील अरुण इलेक्ट्रॉनिकच्या शोरूममध्ये किती किंमत सांगण्यात येते याची पडताळणी केली. याठिकाणी या टीव्हीची ३२ हजार ५०० रुपये किंमत सांगण्यात आली. हेच मॉडेल अ‍ॅमेझॉन २६ हजार ९९९ रुपये किमतीला विकते. यामुळे शोरूम खरेदीत ग्राहकाला ५,५०० रुपयांचा फटका बसू शकतो. शिवाय आॅनलाईन खरेदीमुळे वस्तूची घरपोच डिलिव्हरी मिळते. अरुण इलेक्ट्रॉनिक्समध्येच एलजी कंपनीच्या वॉशिंग मशीनच्या सेमी आॅटोमॅटिक मॉडेल (पी ९०३७  आर ३५ एम)ची किंमत १५ हजार रुपये सांगण्यात आली.  याच मॉडेलची आॅनलाईन किंमत ११ हजार ९८० रुपये आहे. म्हणजे शोरूममध्ये ग्राहकाकडून चार हजार रुपये जादा घेतले जातात.  एलजीचा मायक्रोओव्हन (ई ७६ जेडी-८ २१ लिटर)ची विक्री अ‍ॅमेझॉनवरील आॅनलाईन विक्री किंमत ११ हजार ७९९ रुपये आहे. मात्र, याच मायक्रोेओव्हनची अरुण इलेक्ट्रॉनिक्समधील किंमत १९ ते २० हजार रुपये आहे. सुमारे सात हजार रुपयांपेक्षाही अधिक तफावत याठिकाणी आढळून येते. 

उदाहरण घ्यायचे झाल्यास औैरंगाबादेत दर महिन्याला टीव्हीची विक्री ४ हजारांपेक्षा अधिक होते. जीएसटी लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात वस्तूची किंमत सारखीच राहील, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा ग्राहक  शोरूममध्ये जातो तेव्हा औरंगाबादमधील प्रत्येक डीलर एकाच कंपनीच्या एकाच टीव्ही मॉडेलच्या वेगवेगळ्या किमती सांगत असल्याचे दिसून आले. 

इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (कंपनी)             मॉडेल                                    अरुण इलेक्ट्रॉनिक्स                  अ‍ॅमेझोन १) एलजी टीव्ही                                ३२ इंच जे ६१६                                        ३२,५०० रु.                        २६,९९९ रु.२) एलजी वॉशिंग मशीन     सेमी आॅटोमॅटिक पी९०३७आर३एसएम               १५,००० रुपये                      ११,९८० रु.३) मायक्रोओव्हन                आयएफबी ३०५सी४ (३० लिटर)                         १९ ते २० हजार रु.               ११,७९९ रु.

इलेक्ट्रॉनिक्स उपकरण  (कंपनी)             मॉडेल                                     सानिया डिस्ट्रिब्युटर्स                  अ‍ॅमेझोन १) एलजी टीव्ही स्मार्ट टीव्ही             ४९यूजे६३२टी                                         ७६,९५० रु.                          ६४,४९० रु.२) एलजी एलईडी टीव्ही                        ५७३डी                                                ३२,४९० रु.                          २२,९०० रु.

आॅनलाईन महामेगा आॅफर आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन ग्राहकांसाठी अ‍ॅमेझोन व अन्य आॅनलाईन वस्तू विकणाऱ्या कंपन्या लवकरच महामेगा आॅफर जाहीर करणार आहेत. तसेच ‘अ‍ॅमेझोेन आपल्या दारी’ यासारखे उपक्रमही सर्व आॅनलाईन कंपन्या राबविणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

आॅनलाईन खरेदी फायद्याचीच मी दोन महिन्यांपूर्वी ३२ इंची स्मार्ट टीव्ही खरेदी केला. दुकानात त्याची किंमत १८ हजार रुपये होती. वर्तमानपत्रातील आॅनलाईन शॉपिंगच्या जाहिरातीत हाच टीव्ही १२ हजारांत होता. तो मागविल्यावर मात्र कॅशबॅकमुळे १०,८०० मध्येच मला घरपोच मिळाला. आॅनलाईनप्रमाणे रिटर्न पॉलिसी दुकानदारांकडे नाही. -विष्णू सुरवसे, आॅनलाईन ग्राहक

टॅग्स :onlineऑनलाइनAurangabadऔरंगाबादamazonअ‍ॅमेझॉनconsumerग्राहकConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तू