शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भातील उद्योजकांना वीज सबसिडी चालूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 13:13 IST

यापुढे जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यात येणार

ठळक मुद्देऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहितीनवीन वीज निर्मिती प्रकल्पाचा विचार नाही

औरंगाबाद: विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांना दिली जाणारी वीज सबसिडी चालूच राहणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. उद्योगांची सबसिडी बंद केलेली नाही. एका जिल्ह्यात एका विशिष्ट उद्योगाला सबसिडीचा मोठा वाटा दिल्याची तक्रार आली होती. ही सबसिडी उद्योग वाढीला चालना देण्यासाठी दिली जाते. ती बंद होणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

राज्यातील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे सध्या नवीन वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा विचार नाही. यापुढे जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यात २५ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे राऊत म्हणाले.

सौर ऊर्जेचे मोठ्या प्रमाणावर प्रकल्पमराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात सौर ऊर्जेचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणार आहेत. विद्युत निर्मितीसाठी आपल्याकडे दूर अंतरावरून कोळसा आणावा लागतो. त्यामुळे कोळशाच्या वाहतुकीचा थोडा खर्च वाढतो. त्यावर दरवाढ अवलंबून नसते. वीज दरवाढीचा निर्णय ऊर्जा विभाग घेत नाही. तो निर्णय महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग हा घेत असतो. आम्ही वीजमाफी देऊ शकत नाही. वीजमाफी देण्याचा निर्णय राज्य तसेच केंद्र सरकार घेऊ शकते. केंद्र सरकारने भूमिका घेतल्यास नागरिकांना सोयी-सवलती देता येतील.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतelectricityवीजMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ