शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

"वीज जोडणी खंडित होईल"चे ग्राहकांना मेसेज; लुबाडण्यासाठी सायबर भामट्यांचा नवा फंडा

By साहेबराव हिवराळे | Updated: May 23, 2024 19:41 IST

ग्राहकांनी बनावट संदेशापासून सावध राहा, महावितरणचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : सायबर भामट्यांनी आता आपला मोर्चा औद्योगिक वीज ग्राहकांकडे वळविला आहे. बनावट संदेशापासून सावधानता बाळगण्याचे आवाहन महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.

भामटे खोटे मेसेज करून महावितरण ग्राहकांना लुबाडत आहेत. महावितरणच्या जनजागृतीमुळे त्याला आळा बसल्यानंतर आता औद्योगिक ग्राहकांकडे भामट्यांनी नवा फंडा हुडकला. केंद्रीय विद्युत मंत्रालयाच्या बनावट लेटरहेडवर ग्राहकांना पत्र व बनावट फोन नंबर पाठविण्यात येत आहेत. ‘प्रिय ग्राहक, तुमची वीजजोडणी रात्री ९ वाजता खंडित करण्यात येणार आहे. कारण तुम्ही या महिन्याचे वीज बिल भरले नाही. तत्काळ वीज कार्यालयाशी संपर्क करा. तसेच विद्युत कार्यालयातील सोशल मीडिया अकाउंटवर संपर्क साधावा’, असा यात मजकूर असतो. सोबत खोटा अकाउंट नंबरही असतो. वीज ग्राहकाने संपर्क साधताच मोबाईल व अकाऊंटवर संपूर्ण ताबा मिळवला जातो अन् क्षणात बँक खाते साफ केल्याच्या घटना घडत आहेत.

अनोळखी ॲप अथवा लिंक डाऊनलोड करू नये..महावितरणचे एकच अधिकृत संकेतस्थळ असून यामध्ये ग्राहक सेवेसाठी कंझ्युमर ॲपवरून सेवा दिल्या जातात. वीज बिल वसुलीसाठी सोशल मीडियावर कोणताही संदेश दिला जात नाही. आपली फसवणूक झाल्यास ग्राहकांनी तत्काळ जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. ग्राहकांनी कोणतेही अनोळखी ॲप अथवा लिंक डाऊनलोड करू नये. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नये. काही शंका आल्यास महावितरणच्या २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.-राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीजcyber crimeसायबर क्राइम