शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणुक "ऑनलाईन" पद्धतीनेच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 14:15 IST

Jalgaon Municipality Mayor-Deputy Mayor Election रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या  ''ऑनलाईन'' निवडणुकीच्या घोषणेला खंडपीठात आव्हान दिले होते.

ठळक मुद्देबुधवारी (दि.१७ मार्च) न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली.

औरंगाबाद : जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकी साठी ''ऑनलाईन'' ऐवजी ''सभागृहात प्रत्यक्ष मतदान '' घ्यावे यासाठी दाखल याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने कुठलीही स्थगिती दिली नाही. परिणामी उद्या दि.१८ मार्च रोजीची महापौर व उपमहापौरांची निवडणूक '' ऑनलाईन'' पद्धतीनेच होणार हे स्पष्ट झाले आहे .

बुधवारी (दि.१७ मार्च) न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली. रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या  ''ऑनलाईन'' निवडणुकीच्या घोषणेला खंडपीठात आव्हान दिले होते. राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घेतल्या मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.  विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे असी विनंती त्यांनी केली होती. नुकतीच पिंप्री चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाईन घेणे चुकीचे आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अमरजितसिंह गिरासे, अॅड. योगेश बोलकर, अॅड ज्ञानेश्वर बागुल व अॅड. विष्णू मदन पाटील यांनी तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी.आर.काळे यांनी काम पाहिले .

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठElectionनिवडणूकJalgaonजळगावAurangabadऔरंगाबाद