शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चुनावी जुमला... उमेदवाराने झळकावले ‘बायको पाहिजे’चे पोस्टर! दाखल झाला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 08:15 IST

तीन अपत्य असल्यामुळे आपण महापालिका निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी दुसरी पत्नी हवी, या आशयाचे पोस्टर्स रविवारी शहरात झळकले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. संतप्त भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पोस्टर्सला काळे फासून फाडले.

 औरंगाबाद : तीन अपत्य असल्यामुळे आपण महापालिका निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी दुसरी पत्नी हवी, या आशयाचे पोस्टर्स रविवारी शहरात झळकले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. संतप्त भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पोस्टर्सला काळे फासून फाडले. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच महापालिकेने अनधिकृत पोस्टर लावणाराविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.रमेश विनायकराव पाटील याने रविवारी सकाळी गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट या भागात एकसारख्या मजकुराचे पोस्टर लावले.  त्यावर ‘औरंगाबाद महापालिका निवडणूक २०२२’ असे ठळक अक्षरात लिहून त्या खाली ‘मला तीन अपत्य असल्याने निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. (जातीची अट नाही) वय २५ ते ४० असावे. अविवाहित, विधवा, घटस्फाेटीत चालेल. फक्त दोन अपत्य (मुले) पेक्षा जास्त असणारी चालणार नाही’, असा मजकूर होता. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाले. महिलांनी त्यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. दुपारी भाजप महिला आघाडीच्या मनीषा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पैठणगेट गाठले. भाजप कार्यकर्ता अजय चावरिया यांनी पोस्टरला काळे फासले.  

रमेश पाटीलचा चावटपणा  या पोस्टरची चर्चा शहरभर होवू लागलेली असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास रमेश पाटील पैठणगेटवर आला. त्याने पोस्टरसोबत चक्क फोटो काढले.  

आपण मनसेचा कार्यकर्ता असून, कोणत्याही पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली, तर आपण लढायला तयार असल्याचे यावेळी तो म्हणाला. मनपा, पोलीस यंत्रणा काय करते?n शहरात तीन ठिकाणी चुकीचा संदेश देणारा मजकूर असलेले पोस्टर झळकत असताना पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्न भाजपच्या मनीषा मुंडे यांनी उपस्थित केला. n महिलांची अब्रू वेशीवर टांगण्याचा अधिकार रमेश पाटील याला कोणी दिला. n महिलांचा अपमान केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक