शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या बंडाचा मराठवाड्यातील शिवसेनेला तडाखा; तब्बल ८ आमदार 'नॉट रिचेबल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:33 IST

मराठवाड्यातील शिवसेना आमदारांच्या मतदारसंघासाठी मोठ्याप्रमाणावर विकासनिधी देत मंत्री एकनाथ मंत्री यांनी आपलेसे केले.

औरंगाबाद: मुंबई आणि ठाणे नंतर शिवसेनेला मराठवाड्याने नेहमी साथ दिली आहे. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा फटका मराठवाड्यातील शिवसेनेला बसला आहे. औरंगाबादमधील सहा आमदार, उस्मानाबादमधील दोन आणि नांदेड येथील एक असे तब्बल नऊ आमदार 'नॉट रिचेबल' आहेत. यामुळे मराठवाड्यातील निष्ठावान शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता जाणवत आहे.

शिवसेनेतर्फे मराठवाड्यातून औरंगाबाद जिल्ह्यातून सहा, उस्मानाबादमधून ३, नांदेड, परभणी आणि हिंगोलीतून प्रत्येकी एक आमदार विधानसभेत गेले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मराठवाड्यातून संदीपान भुमरे यांना कॅबिनेट तर अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री पद देण्यात आले. तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांचा विभागात कायम संपर्क राहिला आहे. मंत्री शिंदे यांनी व्यक्तिगतरीत्या लक्ष घालून मराठवाड्यातील शिवसेना आमदारांच्या मतदारसंघासाठी मोठ्याप्रमाणावर विकासनिधी दिला. याचमुळे मंत्री शिंदे यांच्या बंडखोरीला मराठवाड्यातून साथ मिळाली आहे. सेनेचा गड असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. यात वैजापूर- रमेश बोरणारे, सिल्लोड- अब्दुल सत्तार, औरंगाबाद (पश्चिम) संजय शिरसाट, पैठण- संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मोबाईल देखील बंद असल्याने चर्चेला उधान आले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील तीनपैकी माजी मंत्री परंडाचे आमदार तानाजी सावंत, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले हे दोघे नॉट रीचेबल आहेत. तिसरे आमदार उस्मानाबादचे कैलास पाटील मुंबईत असल्याची माहिती आहे. तर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील नॉट रिचेबल आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, परभणीचे आमदार राहुल पाटील पक्ष बैठकीस हजर राहणार होते.

कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक होईल नाराज आमदारांच्या मतदार संघात त्यांच्या 'नॉट रिचेबल' असल्याने नाराजी आहे. तेथील कट्टर शिवसैनिक देखील यावर लक्ष देऊन आहेत. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्या बंडानंतर कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक झाला होता. तसा प्रकार यावेळी देखील होऊ शकतो. पण जे कोणी आमदार नाराज आहेत त्यांची मनधरणी करून. आम्ही लवकरच डॅमेज कंट्रोल करू, असा ठाम विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMarathwadaमराठवाडा