शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत आलो, त्यांच्यासोबतच राहणार; अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 15:53 IST

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड शहरात रविवारी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन पासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विविध गावातील सरपंच, उपसरपंच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

सिल्लोड: काँग्रेस सोडली त्यावेळी ८ महिने कोणताही पक्ष नव्हता. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व आम्ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेत आलो होतो. ते घेतील ते निर्णय आम्हाला मान्य आहे, आम्ही एकनाथ शिंदे सोबतच राहणार, असा खुलासा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सिल्लोड येथे आयोजीत रॅली व सभेला संबोधीत करताना केला. अब्दुल सत्तार सभेला आले नाही मात्र त्यांच्या भावना मी आपल्या पर्यंत पोहचवीत आहे असेही ते म्हणाले

एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड शहरात रविवारी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन पासून रॅली काढण्यात आली, या रॅलीचा समारोप नीलम चौकात झाला. यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विविध गावातील सरपंच, उपसरपंच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.शक्ती प्रदर्शन....सिल्लोड शहरात यावेळी अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मात्र या रॅली व सभेत कुणावरही टीका करण्यात आली नाही. शांततेने ही रॅली काढण्यात आली. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हवामान खराब असल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिल्लोडला आले नाही, असा खुलासा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना समीर म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही नेते  विकास निधी देताना दुजा भाव करत असल्याने विकास काम करण्यास अडथळे निर्माण होत होते. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी दिला. सुख दुःखात सर्व  आमदारांच्या पाठीशी शिंदे उभे होते. यामुळे मोठ्या संख्येने आमदार त्यांच्या पाठीशी आहेत.अब्दुल सत्तार हे संघर्षातुन निर्माण झालेले नेतेकोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सत्तार यांनी राजकारणाची सुरुवात केली व केबिनेट व राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. आम्ही कोणत्याही परिस्थितीला घाबरणार  नाही, यापुढे जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जाऊ. जनता आमच्या पाठीशी आहे असे ही समीर म्हणाले. यावेळी सिल्लोड शहर, ग्रामीण, अजिंठा येथील पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, सीताराम मेहेत्रे, अजित विसपुते,उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे  परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी  एसआरपीची एक तुकडी व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना