शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: "कसं काय पाटील बरं हाय का, दिल्लीत जे घडलं ते खरं हाय का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:36 IST

या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. त्यानंतर, जयंत पाटील यांच्यावरही पलटवार केला. 

औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबाद दौऱ्यातील सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह ठाकरे गटातील शिवसेना नेत्यांवरही त्यांनी तोफ डागली. मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. प्रामुख्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणा दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला. आधी अजित पवार टीका करायचे आता सुप्रिया सुळेही करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रहार केला. तसेच, जयंत पाटील यांनाही, कसं काय पाटील बरं हाय का... असे म्हणत टोमणाही मारला.

ताई म्हणाल्या, अजितदादा सकाळी सहा वाजेपासून काम सुरु करतात. पण ताई, मी सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो. कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे. पण या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. त्यानंतर, जयंत पाटील यांच्यावरही पलटवार केला. 

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टिका केली होती. दिल्लीत सरन्यायाधीशांच्या शपथविधी  सोहळ्याला गेल्यामुळे पाटील यांनी टिका केली होती. त्यावर बोलताना, एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होत आहे, त्यांचं अभिनंदन करायला आम्ही गेलो होते. विशेष म्हणजे या सोहळ्याचं आम्हाला आमंत्रणही होते. विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रण होतं, असेही शिंदे यांनी म्हटले. त्यानंतर, पाटील यांच्यावर टीकाही केली.  

राष्ट्रवादीतील नाराजी नाट्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी निशाणा साधला. काल दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात जयंत पाटील यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना बोलू दिले नाही. जयंत पाटील यांना विरोधी पक्ष नेता व्हायचे होते, पण इथे अजित पवारांची दादागिरी चालली. तर दिल्लीत जयंत पाटील यांनी दादांचे चालू दिले नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी, एक जूनं फेमस गाणं आहे, कसं काय पाटील बरं हाय का, दिल्लीत जे घडलं ते खरं हाय का, असे म्हणत खोचक टोलाही शिंदेंनी लगावला.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे