लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : किरकोळ कारणावरून एकाच्या हातावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शुक्रवारी सकाळी उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केशेगाव येथील महेंद्र प्रकाश गवळी हे शुक्रवारी सकाळी कामानिमित्त बाहेर जात होते़ त्यावेळी गावातील चौघांनी त्यांना शिवीगाळ करीत मोटारसायकलच्या नुकसानीची भरपाई अद्याप का दिली नाही ? असा जाब विचारला़ त्यावेळी महेंद्र गवळी यांनी शिवीगाळ करू नका, येत्या मंगळवारी पैसे देण्यास सांगतो, असे म्हणताच तेथे उपस्थित एकाने घरातील तलवार आणून महेंद्र गवळी यांच्या हातावर वार केला़ इतरांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची फिर्याद गंभीर जखमी महेंद्र गवळी यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिली़ गवळी यांच्या फिर्यादीवरून केशेगाव येथीलच भास्कर मस्के, पृथ्वीराज मस्के, संगिता मस्के, रविराज मस्के या चौघांविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गंभीर जखमीवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत़
केशेगावात एकावर तलवारीने वार
By admin | Updated: May 7, 2017 00:13 IST