शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

एरंडाच्या बिया खाल्ल्याने आठ विद्यार्थिनींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:03 IST

थेरगावातील घटना : पाचोड रुग्णालयात उपचार सुरु

पाचोड : एरंडाच्या बिया खाल्ल्याने थेरगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेतील ८ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सर्व विद्यार्थिनींवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शुक्रवारी दुपारी थेरगावातील शाळेच्या आवारात या मुलींनी एरंडाच्या बिया शेंगदाणे व काजूसारख्या लागतात म्हणून खाल्ल्या. काही वेळानंतर चार वाजेच्या सुमारास शाळा सुटली. याचवेळी शाळेतील विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक विलास गोलांडे यांची भेट घेऊन शाळेतील मुलींनी एरंडाच्या बिया खाल्ल्याचे सांगितले. काही वेळातच या मुलींना चक्कर येण्यास सुरुवात झाली. काहींना उलट्या झाल्या. यामुळे पालकांत घबराटीचे वातावरण पसरले. मुख्याध्यापक विलास गोलांडे, शिक्षक प्रदीप मुंगसे, आबासाहेब टकले, शिवाजी वैद्य व शिक्षकांनी तातडीने या बिया खाल्लेल्या विद्यार्थिनींनी तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात अनुजा दिलीप निर्मळ, प्राजक्ता राऊत, श्रृती ताकपीर, आरती ताकपीर, श्रृती भांगड, सुहाना सय्यद आदी मुलींचा समावेश आहे.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन, डॉ. राऊत हे मुलींवर उपचार करीत आहेत. जि.प. सभापती विलास भुमरे, केंद्रप्रमुख बळीराम भुमरे, मुख्याध्यापक विलास गोलांडे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली.

टॅग्स :SchoolशाळाHealthआरोग्य