करमाड : लाडसावंगी येथून जवळच असलेल्या भोगलवाडी येथे ८ वर्षीय बालिकेवर २० वर्षीय नराधमाने बलात्कार केला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. सदर बालिकेच्या आईने करमाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी मी लाडसावंगीला बाजारासाठी गेले होते. यावेळी त्यांची मुलगी घरी शेजारच्या मुलींसोबत खेळत होती. शेजारी राहणारा आरोपी नारायण सुप्पडसिंग मंदावत (२०) याने तिला आमिष दाखवून त्याच्या घरात नेले व बलात्कार केला. मी जेव्हा बाजार करून घरी आले असता मुलगी रडत होती. तिला विचारले असताना तिने झालेली घटना सांगितली. पोलिसांनी आरोपी नारायण सुप्पडसिंग मंदावत (रा. भोगलवाडी) याला अटक करून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना बारावकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अनिल देशमुख, संजय शिंदे, बाबासाहेब मिसाळ करीत आहेत. (वार्ताहर)
भोगलवाडी येथे आठवर्षीय मुलीवर बलात्कार
By admin | Updated: May 30, 2014 01:01 IST