शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासासाठी मोठी बहिण रागावल्याने आठवीतील मुलीची आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 19:15 IST

अभ्यासाकडे कानाडोळा करीत असल्याचे तिच्या बहिणीच्या लक्षात आले.

ठळक मुद्देअभ्यासासाठी रागावल्याने घर सोडले

औरंगाबाद: अभ्यास करण्यासाठी  मोठी बहिण रागावल्याने दोन दिवसापासून घरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलीचा हडको एन-११ मधील एका विहिरीत मृतदेह आढळला. या मुलीने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. सिडको ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शिल्पा रामकुमार धनगावकर( १४,रा. सुदर्शननगर, हडको)असे मृत मुलीचे नाव आहे. सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की,  शिल्पा ही परिसरातील एका शाळेत आठवीत शिकत होती. तिची मोठी बहिण बारावीमध्ये आहे. शिल्पा अभ्यासाकडे कानाडोळा करीत असल्याचे तिच्या बहिणीच्या लक्षात आले. यामुळे दोन दिवसापूर्वी रात्री शिल्पाला ती अभ्यासावरून रागावली. यानंतर ती घराबाहेर पडली,नंतर शिल्पा घरी परतलीच नाही. यामुळे  नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला.  मैत्रिण आणि अन्य नातेवाईकांकडे गेली नसल्याचे समजल्याने शेवटी गुरूवारी नातेवाईकांनी सिडको पोलीस ठाणे गाठून शिल्पा हरवल्याची तक्रार नोंदविली.

पोलीस आणि नातेवाईकांकडून शिल्पाचा शोध सुरू असताना आज शुक्रवारी सकाळी हडको परिसरातील स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे उद्यानात मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरीकांना शिल्पाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. याघटनेची माहिती लगेच सिडको पोलिसांना कळविण्यात आली. सिडको पोलिसांसोबतच शिल्पाचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून शिल्पाचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह शिल्पाचाच असल्याचे नातेवाईकांनी ओळखले आणि त्यांनी हंबरडा फोडला. यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिल्पा ही यापूर्वीही रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. तेव्हा तिला शोधून आणल्यानंतर तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. या घटनेचा तपास सिडको पोलीस करीत आहेत.