शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीहून रेल्वे, विमानातून आलेले आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:55 IST

दिल्लीहून रेल्वे आणि विमानाने औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदिल्ली येथील व्हायरस अत्यंत गंभीर स्वरूपाचा असू शकतोया व्हायरसने औरंगाबादमध्ये शिरकाव केल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते

औरंगाबाद : दिल्लीहून सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या २६७ प्रवाशांची सोमवारी  औरंगाबाद रेल्वेस्थानकावर तपासणी करण्यात आली. त्यातील तब्बल आठ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. 

दिल्लीहून रेल्वे आणि विमानाने औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. सोमवारी सचखंड एक्सप्रेसने शहरात २६७ प्रवासी रेल्वेस्थानकावर दाखल झाले. सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल आज महापालिकेला प्राप्त झाला. त्यातील आठ प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

मंगळवारी सचखंड एक्सप्रेसने १९७ प्रवासी दाखल झाले. त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी त्याचा अहवाल प्राप्त होईल. मंगळवारी चिकलठाणा विमानतळावर दिल्लीहून आलेल्या तब्बल ५१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सोमवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती, त्यापैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. दिल्लीत ज्या पद्धतीने कोरोना पसरत आहे, त्यामुळे तेथील व्हायरस अत्यंत गंभीर स्वरूपाचा असू शकतो, असा अंदाज महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केला. या व्हायरसने औरंगाबाद शहरात शिरकाव केल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ