शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

आठ महिने उलटले पण औरंगाबाद शहरातील कचरा कोंडी काही फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 11:35 PM

शहरातील कचरा प्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी ९० कोटींचा घसघशीत निधी दिला. महापालिकेला आठ महिन्यांमध्ये एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आला नाही. शहरात जमा होणारा कचरा जिथे जागा मिळेल तेथे नेऊन टाकण्यात येत आहे. अनेक वॉर्डांमध्ये तर महापालिकेने चक्ककचरा बँकाच तयार करून ठेवल्या आहेत. महापालिकेच्या या कारभाराला औरंगाबादकर प्रचंड कंटाळले आहेत.

ठळक मुद्देशासन निधी पडून : प्रशासनाकडून कागदी घोडे नाचविणे सुरू

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी ९० कोटींचा घसघशीत निधी दिला. महापालिकेला आठ महिन्यांमध्ये एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आला नाही. शहरात जमा होणारा कचरा जिथे जागा मिळेल तेथे नेऊन टाकण्यात येत आहे. अनेक वॉर्डांमध्ये तर महापालिकेने चक्ककचरा बँकाच तयार करून ठेवल्या आहेत. महापालिकेच्या या कारभाराला औरंगाबादकर प्रचंड कंटाळले आहेत.१६ फेब्रुवारी २०१८ पासून शहरात कचराकोंडीला सुरुवात झाली. महापालिकेवर मागील ३० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची निर्विवाद सत्ता आहे. राज्यातही युतीचीच सत्ता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी शहरात अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज उभी केली. ९० कोटींचा निधीही दिला. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना खास बाब म्हणून औरंगाबादेत जाऊन प्रश्न सोडविण्याचा आदेश दिला. मनीषा म्हैसकर यांनी महापालिकेला कचरा प्रश्न सोडविण्यासाठी दिलेल्या पंचसूत्रीपैकी एकावरही काम करण्यात आले नाही. त्यामुळे कचºयाच्या प्रश्न जशास तसा आहे.आठ महिन्यांत मनपाने काय केले?५ कोटी रुपये खर्च करून शहरात जिथे तिथे ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्ट पीट तयार केले. या पिटात एक दिवसही ओला कचरा टाकला नाही. आता या कंपोस्ट पिटाचे ‘पिटात’ रूपांतर झाले आहे. त्यानंतर शासनाने नेमलेल्या कचरा संनियंत्रण समितीने हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव, नक्षत्रवाडी येथे प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निर्देश दिले. महापालिका येथे प्रक्रिया केंद्र उभारण्याऐवजी ओला व सुका कचरा नेऊन टाकत आहे. येथे आता कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत.निविदा प्रक्रियेचा खेळचिकलठाणा, पडेगाव येथे ३०० मेट्रिक टन क्षमतेची दोन प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला. वाळूज येथील मायोवेसल कंपनीला कामही देण्यात आले. कंपनीसाठी लागणारे शेडच महापालिकेने आजपर्यंत तयार केलेले नाहीत. नऊ वॉर्डांमध्ये १६ टन क्षमतेच्या मशीन लावून कचºयावर प्रक्रिया करण्याची घोषणा केली. आजपर्यंत हे क्षुल्लक कामही मनपाला करता आले नाही.स्थायीत प्रस्ताव पडूनशहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची निवड केली आहे. ७ वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. २११ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव २२ दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे. स्थायी समितीने आजपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.मुख्यमंत्री घेणार आज आढावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी औरंगाबादेत असून, ते सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. सर्वप्रथम महापालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटींचा निधी दिला होता. या कामांचे काय झाले अशी विचारणाही मुख्यमंत्र्यांकडून होणार हे निश्चित. कचरा प्रश्नातही मुख्यमंत्री महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न