शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

शासनाचे प्रयत्न तोकडे; मराठवाड्यात पाच महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

By बापू सोळुंके | Updated: June 17, 2023 16:09 IST

अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न होत असल्याचा दावा केला जात असला तरी शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. मागील पाच महिन्यांत मराठवाड्यात ३९१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ९८, तर धाराशिव जिल्ह्यातील ८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गतवर्षी अतिवृष्टीसोबत संततधार पावसामुळे मराठवाड्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगामात काहीच लागले नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पेरणीवर केलेला खर्चही वाया गेला होता. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. मात्र, ही मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पदरमोड करून पीकविमा काढला होता. विमा कंपनी दरवर्षी मेअखेरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत असते; परंतु यंदा आतापर्यंत पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिले नाही.

अवकाळी आणि गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, शासनाच्या प्रयत्न अपुरे पडत असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत मराठवाड्यातील ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे.

निम्म्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुदानास पात्रआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला शासनाकडून सानुग्रह एक लाख रुपये अनुदान देण्यात येते. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी २३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या निकषात बसत असल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र शासनाच्या निकषात बसत नसल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदान नाकारण्यात आले आहे, तर ९८ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चौकशी महसूल आणि पोलिस विभागाकडून सुरू आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या?औरंगाबाद --५०जालना--- २५परभणी-- ३२हिंगोली-- १३नांदेड-- ६४बीड-- ९८लातूर-- २८धाराशिव--- ८०

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा