शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा वाढविण्याचा प्रयत्न, महापालिका जायकवाडीतून पाणी उपसा करणारे सर्व पंप बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:58 IST

Aurangabad Municipal Corporation trying to increase water supply सध्या शहराला १२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देशहराच्या पाण्यात २० एमएलडीची वाढ होईल.अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा २० एमएलडीने कसा वाढविता येईल, यादृष्टीने महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सोबत घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. जायकवाडीतून पाणी उपसा करणारे सर्व पंप जुने आहेत. त्यांची कार्यक्षमता संपली आहे. येथे नवीन पंप बसवून आवश्यक तेथे बायपास जलवाहिनी टाकून शहरासाठी पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे. हा एक प्रयत्न आहे, तो कितपत यशस्वी होईल, हे सांगणे अवघड असल्याचे मत मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या कमकुवत झाल्या आहेत. पाण्याचा किंचितही वेग वाढविला तर त्या फुटतात. अशा गंभीर परिस्थितीत शहराचा पाणीपुरवठा वाढविणे खूप आव्हानात्मक आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांनाच पाणी वाढविण्याच्या संदर्भात सूचना केली आहे. तज्ज्ञ अधिकारी यावर अभ्यासही करीत आहेत. सध्या शहराला १२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. त्यात आणखी वाढ करण्यासाठी आवश्यक विविध उपाययोजना करण्यात येतील. सर्वप्रथम जायकवाडीतील सर्व जुनाट पंप बदलून नवीन बसविण्यात येणार आहेत. जेथे जलवाहिनी खूपच कमजोर आहे, तेथे बायपास पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या पाण्यात २० एमएलडीची वाढ होईल. यापेक्षा जास्त पाण्याची वाढ करता येणार नाही, असे तज्ज्ञांनी मनपाला सांगितले आहे.

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभावदोन आठवड्यांपूर्वी मनपा प्रशासकांनी पाणीपुरवठ्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली. यामध्ये काही कनिष्ठ तर काही वरिष्ठ आहेत. अधिकाऱ्यांच्या आपसातील गटबाजीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या प्रकरणातही प्रशासक आता लक्ष घालणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणी