शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Education: नवे शैक्षणिक वर्ष दोन महिन्यांवर; राज्यात १७ हजारांपेक्षा जादा पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 08:11 IST

Education: प्राथमिक शिक्षकांच्या भरतीबाबत मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी सोमवारी राज्य शासनास दिले.  

छत्रपती संभाजीनगर : प्राथमिक शिक्षकांच्या भरतीबाबत मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी सोमवारी राज्य शासनास दिले.  

सुनावणीदरम्यान न्यायालयाचे मित्र ॲड. अजित घोलप यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, नवीन शैक्षणिक वर्ष (२०२३-२४) सुरू होण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी राहिला असून, अद्याप जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. शिक्षकांची भरती हा ‘मूळ मुद्दा’ आहे, तर संबंधित शिक्षकांच्या पात्रतेविषयक (टीएआयटी) परीक्षा घेऊन शासनाने दि. २४ मार्च रोजी निकाल जाहीर केला असल्याचे सहायक सरकारी वकील प्रवीण पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.  

खंडपीठाच्या दि. २२ सप्टेंबर २०२२च्या आदेशानुसार शासनाने प्राथमिक शिक्षक भरतीसाठीच्या ‘टीएआयटी’ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दि. १३ ऑक्टोबर रोजी खंडपीठात सादर केले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. त्यावर खंडपीठाने शासनास वरीलप्रमाणे निर्देश दिले. या ‘सुमोटो जनहित याचिकेवर’ दि. २८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी आहे.

टीएआयटीचा निकाल जाहीर, पण भरती कधी? n२०१७ साली एकदाच टीएआयटी परीक्षा झाली होती. त्यानंतर  ती परीक्षा झाली नव्हती. तेव्हापासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही. nपरिणामी छत्रपती संभाजीनगर आणि जालना  वगळता राज्यात प्राथमिक शिक्षकांची जवळपास १७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, असे यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले.  nमात्र, खंडपीठाच्या दि. २२ सप्टेंबर २०२२च्या आदेशानुसार शासनाने परीक्षा घेऊन दि. २४ मार्च रोजी निकाल जाहीर केला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र