शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून आज शैक्षणिक सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:53 IST

मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा आंदोलन : कायदा व सुव्यवस्थेसाठी निर्णय; विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आणि महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुरुवारी (दि. ९) एक दिवसाकरिता औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात यावीत, तसेच याविषयीचे आदेश आपल्या स्तरावरून तातडीने निर्गमित करून अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये एक दिवसाची सुटी देण्याचा निर्णय घेतला. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी गुरुवारी शैक्षणिक सुटी असल्यामुळे कामकाज होणार नसल्याचे पत्रही काढले आहे.जिल्ह्यातील शाळा बंद राहणार४जिल्ह्याधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे पत्र माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी काढले. या सुटीच्या दिवशीच्या अध्यापनाच्या तासिका इतर दिवशी अतिरिक्त तासिका घेऊन पूर्ण करण्याच्या सूचनाही डॉ. चव्हाण यांनी दिल्या. तसेच खासगी संस्थाचालकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळविले आहे.शांततेचे आवाहनराज्यस्तरीय बंद शांततेत पाळावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने नागरिकांना बंद शांततेचे आवाहन केले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, बंद शांततेत पाळण्यात यावा, शासकीय, खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्यात येऊ नये, असे पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय शहरात शांततेसाठी तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.असा असेल पोलीस बंदोबस्त...पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, ६ सहायक आयुक्त.३० पोलीस निरीक्षक, १०० सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि २ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ६२ चौकात फिक्स पॉइंटरॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची एक तुकडी तर राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या.ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ग्रामीण भागात १३४ पोलीस अधिकारी, १ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड जवान आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन