शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे अधिकारी चक्रावले; बंद शाळांना अनुदान कसे?

By विजय सरवदे | Updated: April 25, 2023 19:11 IST

संचालक कार्यालयाने मागितला तातडीने अहवाल

छत्रपती संभाजीनगर : बंद शाळांची नावे अनुदान यादीत आलीच कशी, शाळांचे अनुदान मूल्यांकन कोणी केले होते, अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत, यासंबंधीचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करा, असे निर्देश सोमवारी सकाळीच शिक्षण उपसंचालक, तसेच शिक्षण संचालक कार्यालयाने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना दिले.

‘लोकमत’ने सोमवार, दि. २४ एप्रिल रोजी ‘धक्कादायक! बंद शाळाही आता अनुदानाच्या यादीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले आणि छत्रपती संभाजीनगर ते पुण्यापर्यंत संपूर्ण शिक्षण विभाग हादरून गेला. अनुदानाच्या यादीत बंद असलेल्या शाळा आल्या कोठून, हा एकच प्रश्न माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना शिक्षण संचालक कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी केला. तेव्हा शिक्षणाधिकारी देशमुख यांनी हा प्रकार माध्यमिक विभागात घडलेला नाही, असा खुलासा केला, तर शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी प्राथमिक विभागात हा प्रकार घडला असला, तरी ‘त्या’ शाळेची शिफारस या कार्यालयाकडून झालेली नाही, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी अघोषित शाळांचे अनुदान मूल्यांकन कोणी केली होते, ही तपासणी जिल्हास्तरीय समितीने कधी केली होती. अशा किती बंद शाळांची नावे अनुदान यादीत आली आहेत, यासंबंधीचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी चव्हाण यांना दिले. त्यानंतर, सोमवारी दुपारनंतर अनुदानासाठी प्राप्त झालेले शाळांचे प्रस्ताव, स्थळ पाहणी, प्रस्तावानुसार केलेली तपासणी आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर केलेल्या शिफारसींचे गठ्ठे शोधण्याच्या कामाला लागले.

ही बाब तर गंभीरचया संदर्भात शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले की, ‘लोकमत’मध्ये आलेल्या बातमीच्या अनुषंगाने सकाळीच आम्हाला शिक्षण संचालक कार्यालयाकडून विचारणा झाली. तत्पूर्वी, मी शिक्षणाधिकारी चव्हाण यांच्याकडे या अनुषंगाने विचारणा केली. शिक्षणाधिकाऱ्यांना यासंबंधीचा सविस्तर अहवाल मागितला असून, तो लवकरच शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर केला जाईल.

टॅग्स :SchoolशाळाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण