शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलात न भूतो न भविष्यति तेजी; हरभरा, तूर डाळीत मंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 20:07 IST

सूर्यफूल तेल व पामतेलाची आयात कमी झाली आहे. परिणामी देशाअंतर्गत खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत.

ठळक मुद्देसोयाबीन तेल चक्क ११५ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहे.सरकी तेल ११० रुपये, पामतेल ११० रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.

औरंगाबाद : आवक कमी झाल्याने सोयाबीन तेल, सरकी तेल, पामतेल व वनस्पती तुपाच्या भाववाढीने आतापर्यंतचा नवीन उच्चांक गाठला आहे. यामुळे न भूतो न भविष्यति एवढी तेजी आली आहे. फोडणी देण्यासाठी गृहिणी दहादा विचार करत आहेत. हरभरा डाळ व तूर डाळीत किलोमागे १० रुपयांची घसरण झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

सूर्यफूल तेल व पामतेलाची आयात कमी झाली आहे. परिणामी देशाअंतर्गत खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. मागील आठवड्यात लिटरमागे ५ रुपयांनी भाववाढ होऊन सोयाबीन तेल चक्क ११५ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यापाठोपाठ सरकी तेल ११० रुपये, पामतेल ११० रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. आजपर्यंत या खाद्यतेलाचे भाव कधीच एवढे झाले नव्हते. पामतेल महागल्यामुळे वनस्पती तूपही किलोमागे ५ रुपयांनी वधारून ११० रुपये प्रतिकिलो विकल्या जात आहे. नवीन शेंगदाण्याची निर्यात होत असल्याने शेंगदाणा तेल लिटरमागे १० वधारून १५० ते १५५ रुपये लिटर विकत आहे. नवीन करडीची एप्रिलमध्ये आवक होईल.

ग्राहकांना दिलासहरभरा डाळ व तूर डाळीच्या किमतीत किलोमागे १० रुपयांनी भाव घसरले आहे. हरभरा डाळ ५३ ते ५७ रुपये तर तूर डाळ ७८ ते ८२ रुपये प्रतिकिलो विकत आहे.- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी

खाद्यतेलात भडकाआयात कमी झाल्याने खाद्यतेलात भाववाढीचा भडका उडाला आहे. लग्नासाठी ५० लोकांची मर्यादा घालून दिल्याने खाद्यतेलाच्या मागणीवर त्याचा परिणाम झाला. - जगन्नाथ बसैये, खाद्यतेल विक्रेते

भाज्यांमध्ये मंदी कायमबटाटा जुना ३० रुपये, नवीन २५ रुपये, कांदा ३० रुपये, काकडी १० रुपये किलो, टोमॅटो २० रुपये किलो ग्राहकांना मिळत आहे. यापेक्षा ५ रुपये कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. काकडी, पालेभाज्या शेतातून काढून आणणे परवडत नाही.- सखाराम शिंदे, शेतकरी

खाद्यतेलात तेजीखाद्यतेल १३ डिसेंबर(लिटर)  २० डिसेंबरसोयाबीन तेल ११० रु.          ११५ रु.सरकी तेल १०५ रु.               ११० रु.पामतेल १०५ रु.                   ११० रु.

डाळीत मंदीडाळी १३ डिसेंबर(किलो)           २० डिसेंबरहरभरा डाळ ६३- ६७ रु.            ५३-५७ रु.तूर डाळ ८८- ९२ रु.                  ७८-८२ रु.गहू            १९ - ३२ रु.            २०-३३ रु.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार