शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेण्यांत ई-वाहनेच ‘डिस्चार्ज’; एसटीवर मदार, पेंटिंग सुरक्षित राहणार तरी कशी?

By संतोष हिरेमठ | Updated: November 7, 2025 18:00 IST

साधारणतः १८ वर्षांपूर्वीपर्यंत अजिंठा लेण्यांच्या पायथ्यापर्यंत सर्वसामान्य पर्यटकांची वाहने जात होती. मात्र, तेथे प्रदूषण पातळी वाढल्याने या लेण्यांपर्यंत वाहनांचा प्रवास थांबविण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : मोठा गाजावाजा करून अजिंठा लेण्यांत पर्यटकांच्या सुविधेसाठी ई-वाहने सुरू करण्यात आली; परंतु ही वाहने पर्यटकांचा भारही सहन करू शकत नव्हती. शिवाय मध्येच बंद पडत होती. परिणामी, ही ई-वाहने बंद करण्याची नामुष्की ओढवली असून, पर्यटकांची वाहतूक एसटी महामंडळाच्या डिझेल बसमधून होत आहे. त्यामुळे लेण्यांतील पेंटिंग सुरक्षित राहणार तरी कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

साधारणतः १८ वर्षांपूर्वीपर्यंत अजिंठा लेण्यांच्या पायथ्यापर्यंत सर्वसामान्य पर्यटकांची वाहने जात होती. मात्र, तेथे प्रदूषण पातळी वाढल्याने या लेण्यांपर्यंत वाहनांचा प्रवास थांबविण्यात आला. अजिंठा टी पॉइंट येथून पर्यटकांना एसटी बसने लेण्यांकडे नेले जाते; परंतु यांतील काही बसगाड्याही धूर ओकतात. त्यामुळे लेण्यांतील चित्रांवर परिणाम होण्याची चिंता पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येते. प्रदूषण कमी होऊन पेंटिंग सुरक्षित राहावीत, या दृष्टीने पर्यटन संचालनालयाकडून या ठिकाणी १४ आसनी ई-वाहने सुरू करण्यात आली; परंतु ती काही दिवसांतच ही वाहने बंद पडली आहेत.

का बंद झाली ई-वाहने?लेण्यांपर्यंतचा रस्ता काहीसा चढाचा आहे. त्यामुळे ई-वाहने पर्यटकांचा भार घेऊ शकत नव्हती. शिवाय खड्डेमय रस्त्यामुळेही त्यात भर पडत होती. ही वाहने अचानक बंद पडत होती. त्यामुळे ती बंद करून लवकरच नवीन वाहने आणली जाणार आहेत.

जुन्या बस बदलाअजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या जुन्या, खराब झालेल्या बस बदलून नव्या इलेक्ट्रिक बसेस चालविण्यात याव्यात. बसस्टॉपपासून लेण्यांपर्यंतचा रस्ता दुरुस्त करावा.- राहुलदेव निकम, अध्यक्ष, अजिंठा गाइड असोसिएशन

लवकरच २२ आसनी ई-बसअजिंठा लेण्यांत लवकरच २२ आसनी ई-बस येतील. टप्प्याटप्प्यांत एकूण २० ई-वाहने येतील. कमीत कमी वेळेत पर्यटकांची चढ-उतार होईल, अशी या ई-वाहनांची रचना असेल. ही ई-वाहने आल्यानंतर डिसेंबर अथवा जानेवारीपर्यंत लेण्यांसाठी एसटी बसेस धावणे पूर्णपणे थांबेल.- विजय जाधव, प्रादेशिक उपसंचालक, पर्यटन संचालनालय

English
हिंदी सारांश
Web Title : Ajanta Caves: E-vehicles fail, diesel buses threaten paintings.

Web Summary : E-vehicles at Ajanta Caves failed due to terrain and capacity. Diesel buses are back, raising concerns about painting preservation. New electric buses are planned to replace them, aiming for pollution reduction and tourist convenience. 22-seater e-buses are coming soon.
टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळenvironmentपर्यावरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर