शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दसरा-दिवाळीची लगबग वाढली; बाजारपेठेत मिळाली हजारो बेरोजगारांना हंगामी नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:42 IST

छत्रपती संभाजीनगरात दीड हजार कोटीची उलाढाल शक्य

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवापासून महासणाला सुरुवात होत आहे. दसरा- दिवाळीदरम्यान सुमारे दीड हजार कोटीची उलाढाल बाजारपेठेत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीनंतर लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. ऐनवेळेवर कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये म्हणून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी नोकरभरती केली आहे.

४० हजार दुकाने, २ लाख कर्मचारीमनपा हद्दीत लहान-मोठे ४० हजार दुकानदार आहेत. त्यांच्याकडे कायमस्वरूपी २ लाख कर्मचारी आहेत. सणासुदीच्या दिवसांत नोकरदारांची कमतरता जाणवते. यामुळे काही महिन्यांसाठी अधिकची नोकरभरती केली जाते. मागील गणेशोत्सवापासून हंगामी नोकरभरती केली जात आहे. व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनी बाजारपेठेतील विविध क्षेत्रांतील व्यापाऱ्यांकडून आढावा घेतल्यावर १९ हजार बेरोजगारांना हंगामी नोकरी मिळाल्याचे समोर आले.

दरवर्षी होते नोकरभरतीदसरा-दिवाळीआधी दरवर्षी हंगामी नोकरभरती केली जाते. यात सर्वाधिक नोकरभरती कापड बाजारात होते. त्यानंतर किराणा, कटलरी, भेटवस्तू अन्य क्षेत्रांत नोकरभरती होते. कोरोनाकाळात निर्बंधामुळे कोणी नोकरभरती केली नव्हती; पण मागील ३ वर्षांपासून पुन्हा हंगामी नोकरभरती सुरू झाली. कोरोना काळानंतर व्यावसायिकांची संख्या १० हजारांनी वाढली. तसेच ५० हजारांनी नोकर कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली.- अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, ‘कॅट’

बाजारपेठेतील स्थिती आकडेवारीत :१) ४०,००० लहान-मोठे व्यापारी.२) २००००० नोकर, कर्मचारी.३) १९००० बेरोजगारांना मिळाली हंगामी नोकरी

दीड हजार कोटीची उलाढाल अपेक्षितयंदा पावसाने मोठी साथ दिली. धरणे, तलाव तुडुंब भरली. यामुळे पाण्याची चिंता मिटली. उद्योगाला पाणी मिळेल, शेतीत रब्बी हंगामात पाणी मुबलक असणार आहे. यामुळे नवरात्रोत्सव-दसरा व दिवाळीदरम्यान शहरात यंदा दीड हजार कोटीची उलाढाल होईल, असा अंदाज आहे.- लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDiwaliदिवाळी 2023Marketबाजार