शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
2
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
3
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
5
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
6
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
7
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
8
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
9
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
10
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
11
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
12
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
13
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
14
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
15
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
16
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
17
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
18
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
19
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
20
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या बंगल्यावर फेकले शेण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 19:45 IST

कथित ऑडीओ क्लिपमध्ये मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरले, असा आक्षेप घेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. लोणीकर यांच्या सातारा परिसर येथील बंगल्या समोर आंदोलन केले.

औरंगाबाद: भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या अशोकनगर येथील बंगल्यावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी शेण फेकले. थकीत वीजबिलावरून मीटर काढल्याचा आरोप करत आ. लोणीकर यांनी अभियंत्याला धमकावल्याच्या कथित ऑडियो क्लिपमध्ये मागासवर्गीयांबद्दल अपशब्दांचा वापर केला आहे, यावर आक्षेप घेत आक्रमक कार्यकर्त्यांनी शेण फेक करत जोरदार घोषणाबाजी केली. 

महावितरणच्या अभियंत्याला थकीत वीज बिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत, याच जाब विचारत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शिवीगाळ केल्याची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान, या क्लिपमध्ये मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत, यावर आक्षेप घेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आ. लोणीकर यांच्या सातारा परिसर येथील बंगल्या समोर आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आ. लोणीकर यांच्या बंगल्यावर  शेण फेकून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.  या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ निलेश आंबेवाडीकर,  अनुराग शिंदे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष विजय कांबळे, गुरमित गिल,आकाश रगडे,मयुर साठे,विनोद उंटवाल आदींचा सहभाग होता. 

अॅट्रॉसीटी कायद्यानुसार कारवाईची मागणीदरम्यान,  मागासवर्गीय समाजाबद्दल आ. बबनराव लोणीकर यांनी कथित ऑडीओ क्लिमध्ये अपशब्द वापरले आहेत. हा सर्व प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणी आ. बबनराव लोणीकर यांच्यावर तत्काळ अॅट्रॉसीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पँथर रिपब्लिकन पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्यावतीने आज पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुणारत्न सोनवणे, अविनाश डोंगरे, अमोल भालेराव, सागर चक्रनारायण, राहुल तायडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण