शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

सोयगाव तालुक्यात पुरात बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश; ८० गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:19 IST

दोघांना बुडताना वाचविण्यात यश 

सोयगाव : तालुक्यात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील जवळपास सर्वच नद्या, नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे तालुक्यातील ८० गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. 

सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील सर्वच नद्यांना पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती. बहुला(बहुलखेडा)नदीने आक्राळविक्राळ रूप धारण केल्याने पुराचे पाणी शेतात शिरले होते. दरम्यान बनोटी मंडळात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात येत असून दुपारपर्यंत आकडेवारी हाती आलेली नव्हती. पिकांमध्ये पाणी शिरले होते. पावसाचा जोर अधिक असल्याने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रशासन पाहणीवरदुपारी उशिरापर्यंत प्रशासनाकडून बनोटी मंडळातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या पथकाने काही गावांना भेटी दिल्या. पूरग्रस्त गावांनाही भेटी देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या दोघांना वाचविण्यात यशवनगाव येथील नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना अंबादास दुबे(वय ३८)व सचिन दुबे(वय २२) दोघेही दुचाकीवरून जात होते. यावेळी दुचाकीसह वाहून जात दोघांनाही ग्रामस्थांनी वाचविले आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसAurangabadऔरंगाबाद