शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

थातूरमातूर डागडुजीमुळे औरंगाबाद-जालना महार्गावर पुन्हा खड्डडेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 12:17 IST

Potholes on Aurangabad - Jalana Highway : औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद-जालना महामार्गाची झाली चाळणीपक्क्या दुरूस्तीशिवाय हाल थांबणार नाहीत

- श्रीकांत पोफळे

करमाड (औरंगाबाद ) : मागील २ ते ३ वर्षांपासून औरंगाबाद-जालना महामार्गाची ( Aurangabad - Jalana Highway) पक्या​ स्वरूपात डागडुजी झालेली नाही. त्यात मागच्या वर्षी या परिसरात विक्रमी पाऊस झाला. यामुळे या महामार्गाची पूर्णतः चाळणी झाली होती. दरम्यान, मागील पंधरवाड्यापासून विकासक यंत्रणेकडून सुरू असलेली डागडुजी हा देख्याव्याचा फार्स ठरत असल्याचे चित्र आहे. कारण, ही दुरूस्ती म्हणजे पुढे पाठ मागे सपाट अशी ठरत आहे.

औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. यावर पडलेल्या मोठ-मोठया खड्यामुळे दररोजच लहान-मोठे अपघात घडतात. यातच पडलेल्या खडड्याची डागडुजी होत नसल्याने पाणी साचून हे खड्डे धोकादायक बनत चालल्याने ते तात्काळ बुजवावे, अशा आशयाचे निवेदन औरंगाबाद तालुका भारतीय जनता युवा मोर्चा शाखेच्या वतीने 17 जुलैला टोल व्यवस्थापकांना देण्यात आले. ही बाब आमदार हरिभाऊ बागडे ( Haribhau Bagade ) यांच्याही कानावर घातली. आ. बागडे यांनी यावेळी कार्यकर्त्यां समोरच संबंधितांचे चांगलेच कानही उपटले होते. पुढील चार दिवसांत सदरील दुरूस्तीचे काम हाती न घेतल्यास टोल नाक्यावर बस्तान मांडुन टोल वसुली बंद करण्यात येऊन आंदोलन करण्याचा इशाराही बागडे नानांनी दिला होता.

यावरून औरंगाबाद-जालना टोलवेज या विकासक कंपनीने आंदोलनाचा धसका घेत सर्वांत जास्त खड्डे पडलेल्या करमाड बसस्थानकाच्या आजुबाजुचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवुन वेळ मारून नेली. त्यानंतर कॅम्ब्रीज ते शेकटा गावापर्यंत पडलेल्या खड्ड्याचे पॅचवर्कचे काम करण्यात आले. आजही काही ठिकाणी हे काम सुरूच आहे. दरम्यान, या कामावेळी फक्त मोठ-मोठे खड्डे व चाळणी झालेल्या भागाचेच पॅचअप करण्यात आले. उर्वरित ठिकाणी मागील चार-पाच दिवसाच्या भिजपावसाने नव्याने खड्डे पडले आहेत तर पॅचअप केलेल्या काही ठिकाणीही पुन्हा थिगळे देण्याची वेळ येणार असल्याने संपूर्ण महामार्गाचे पक्के लेअर देऊन डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांतुन होत आहे.​

तथापि, डागडुजी दरम्यान करमाड बसस्थानका शेजारील तात्पुरत्या स्वरूपातील बुजवलेल्या खड्ड्यांची डागडुजी झालीच नाही. त्यामुळे आता हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या ठिकाणी आजमितीस चार बाय तीन लांबीचे तर दोन-दोन फुट खोलीचे भयावह खड्डे पडलेलेे दिसुन येते. या ठिकाणी दररोजच किरकोळ अपघात व कित्येक वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. इतर ठिकाण सारखी डागडुजी तातडीने करण्यात यावी अशी मागणी करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, माजी सरपंच दत्ता उकर्डे, रविकुमार कुलकर्णी, योगेश कुलकर्णी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPotholeखड्डेhighwayमहामार्ग