शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्याने शहर पाच तास बुडाले अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:11 IST

१३२ केव्ही वाहिनीचे अर्थिंग वायर तुटल्याने महावितरणच्या ३३ केव्हीची ५ उपकेंद्रे बंद झाली.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी ११ केव्ही वाहिन्यांवर झाडे कोसळली एक प्रकारे महावितरणचा कारभार उघडा पडल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

औरंगाबाद : शहरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्याला आणि पावसाला सुरुवात होताच शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. शहरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री ८.३० वाजेपर्यंतही सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे शहर अंधारात बुडाले होते.  

शहरात दुपारी ४.२० वाजता महापारेषण कंपनीच्या हर्सूल ते चिकलठाणा या १३२ केव्ही वाहिनीचे अर्थिंग वायर तुटल्याने महावितरणच्या ३३ केव्हीची ५ उपकेंद्रे बंद झाली. त्यामुळे संपूर्ण चिकलठाणा, सिडको, नारेगाव परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ७ वाजता ३३ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, अनेक ठिकाणी ११ केव्ही वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने सिडकोतील बहुतांश भागात रात्री ८.३० वाजेपर्यंत अंधार होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे करून एन-५ चा वीजपुरवठा सुरू केला, तर चिकलठाणा परिसरात इंडस्ट्रियल ३ वाहिन्या व इतर ३ वाहिन्या वगळता एन-१, एन-२ सिडको, मुकुंदवाडी, एन-३, एन-४ चा वीजपुरवठा सुरळीत के ला. घरावरील पत्रे झाडे व वाहिन्यांवर कोसळल्याने हर्सूल, शहागंज, सिटीचौक, कटकटगेट परिसरातही वीजपुरवठा खंडित झाला होता.

पाणचक्कीसमोर ३३ केव्ही वाहिनीवर झाड कोसळल्याने पॉवर हाऊस उपकें द्र्र बंद पडले होते. त्यामुळे समर्थनगर, औरंगपुरा, गुलमंडी, निराला बाजार, बसस्थानक रोड, म्हाडा कॉलनीचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने झाड काढून दुरुस्तीचे काम केल्याने सायंकाळी ६ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. नक्षत्रवाडी, सातारा परिसर, गारखेडा भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला. हानी जास्त असल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची उशिरापर्यंत कसरत सुरू होती. अनेक भागांतील वीजपुरवठा रात्री उशिरा सुरळीत होणार असल्याची माहिती महावितरणकडून नागरिकांना दिली जात होती.

साहेब, लाईट केव्हा येणार?क्रांतीचौक, निराला बाजार, एन-८, एन-६, जटवाडा रोड, टीव्ही सेंटरसह विविध भागांत अंधार पसरला होता. शहरातील विविध नागरिक महावितरणच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करून साहेब, लाईट केव्हा येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे आणि खबरदारीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे रविवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले. एक प्रकारे महावितरणचा कारभार उघडा पडल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण