शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आवक वाढल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात अर्ध्या टक्क्याने वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:54 IST

जायकवाडी धरणाच्या नाथसागरात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ७७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आवक वाढुन १८१०० एवढी झाली.

ठळक मुद्देअवघ्या तीन तासात आज धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. 

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या नाथसागरात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ७७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आवक वाढुन १८१०० एवढी झाली, दरम्यान अवघ्या तीन तासात आज धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. 

यंदा जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही धरणात थेंबभर पाण्याची आवक झालेली नव्हती यामुळे धरण प्रशासनासह मराठवाड्यातील जनतेच्या नजरा या पाण्याकडे लागल्या होत्या. दरम्यान आज धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने मराठवाडाभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्हातील धरण समूहातून आज विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मध्यरात्री पासून वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

धरणात आज सायंकाळी १९.३०% जलसाठा झाला होता. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शनिवार पासून पावसाने सततधार कायम ठेवल्याने गोदावरीस पुर आला. सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता आज मंगळवारी यात दुपटीने वाढ झाल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे यामुळे जायकवाडीत येणारी आवक  सतत वाढत आहे.

तीन तासात अर्धा टक्का वाढजायकवाडी धरणात आवक सुरू होण्यापूर्वी जलसाठा १८.७९% एवढा होता दरम्यान तीन वाजेस धरणात आवक सुरू झाली व ६ वाजेस जलसाठा १९.३०% एवढा झाला होता. धरणात ११.०७१ दलघमी एवढी वाढ नोंदविली गेली. आजरोजी धरणात एकूण जलसाठा ११५७.२४० दलघमी तर उपयुक्त जलसाठा ४१९.१३४ एवढा झाला आहे असे धरण अभियंता बुध्दभूषण दाभाडे, रमेश चक्रे व श्याम शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊस