शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

जोरदार पावसामुळे पडझड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:12 AM

बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यानंतर गुरुवारी देखील पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे या आठवड्यात पावसाची चांगलीच उपस्थिती जाणवत आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्यानंतर गुरुवारी देखील पावसाने हजेरी लावली. दुपारी एक वाजेच्या सुमारास अर्ध्या तासात १२.८ मि. मी. पाऊस पडल्याचे चिकलठाणा वेधशाळेने सांगितले.रात्रभर रिमझिम पाऊस पडल्यानंतर गुरुवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. परंतु सकाळपासून वातावरण ढगाळ होते. दुपारच्या सुमारास काही वेळ सूर्यदर्शन झाले. त्यामुळे आज पाऊस पडणार नाही, असे वाटत असतानाच दुपारी १२ वाजता काळेकुट्ट आभाळ दाटून आले. साडेबाराला टपोºया थेंबांनी मुसळधार पावसाने सलामी दिली; परंतु पहिल्या टप्प्यात केवळ काही मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर दुपारी १ वाजता धोऽऽ धो पाऊस झाला. पावसाचा तडाखा पाहून बुधवारप्रमाणे शहरात पुन्हा पाणी साचणार असे वाटत होते. मात्र, अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर ओसरला. दुपारनंतर शहरावर ढगांची छाया कायम राहिली.सलग दुसºया दिवशीही पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात २१.१ मि. मी. पावसाची नोंद झाली.नवरात्र महोत्सवाला गुरुवारी सुरुवात झाली. त्यामुळे दसरा खरेदीच्या अपेक्षेने व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलेला आहे. मात्र, सलग दोन दिवस पडलेल्या पावसाने खरेदीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू असल्याने लोकांनी खरेदीसाठी बाहेर जाण्याचे टाळले.त्यामुळे बाजारात गर्दी घटली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. अपेक्षेप्रमाणे दुपारी जोरदार पाऊस आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसातून शहरवासीय अजून सावरलेले नसताना, पावसाने दुसरा तडाखा दिला. अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खडी पसरलेली आहे तर काही ठिकाणी रस्तेच वाहून गेलेले आहेत. खड्ड्यांचा आकार पावसामुळे आणखी वाढलेला असल्यामुळे वाहतुकीची मोठी अडचण होत आहे.औरंगाबाद तालुक्यात बुधवारी चार मंडळांमध्ये अतिवृष्टीमागच्या आठ दिवसांपासून शहरावर वरुणराजाची कृपा टिकून आहे. औरंगाबाद तालुक्यात बुधवारी (दि.२०) दहा मंडळांपैकी उस्मानपुरा (७१ मि.मी.), भावसिंगपुरा (७८ मि.मी.), वरुडकाजी (७८ मि.मी.) आणि चिकलठाणा (६५ मि.मी.) या चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.याचबरोबर औरंगाबाद शहर (५९ मि.मी.), लाडसावंगी (५० मि.मी.), कांचनवाडी (५३ मि.मी.) आणि करमाड (४१ मि.मी.) या मंडळांमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली. चित्तेपिंपळगाव (१५ मि.मी.) आणि चौका (१० मि.मी.) या दोन मंडळांचा अपवाद वगळता औरंगाबाद तालुक्यात चांगला पाऊस झाला.दुपारी चार वाजता सुरू झालेला हा पाऊस सुमारे तीन तास बरसला. सायंकाळी सात वाजता पावसाचा जोर ओसरला; मात्र रात्रभर थोड्याअधिक प्रमाणात रिपरिप सुरूच होती. मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी तुंबले होते. बहुतांश सखल भागांतील घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने सामान्यांचे चांगलेच हाल झाले.नाले ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. एकूणच शहरवासीयांची दाणादाण उडाली.जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महालगावातऔरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता बुधवारी वैजापूर तालुक्यातील महालगाव मंडळात (११० मि.मी.) सर्वाधिक पाऊस पडला. जिल्ह्याच्या क्रमवारीत औरंगाबादनंतर वैजापूर तालुक्याचा (५४.९० मि.मी,) दुसरा क्रमांक तर पैठण तालुक्याचा (१५.३० मि.मी.) सर्वात शेवटचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत वैजापूरमध्ये २१ सप्टेंबरपर्यंत १२६ टक्के पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्याची बुधवारी सरासरी ३०.३४ मि.मी. एवढी होती.