शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अधिष्ठातांच्या दिरंगाईमुळे पीएच.डी. विभागाच्या कामाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:22 IST

व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या तक्रारी; दोन दिवसांत घेणार मॅरेथॉन बैठक

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच. डी. विभागात विद्यार्थ्यांची कामे सामाजिकशास्त्रे, विज्ञान आणि आंतरशाखीय विद्याशाखा या दोन विभागाच्या अधिष्ठातांमुळे रखडली असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषद सदस्यांनी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या दालनात अधिष्ठातांच्या समोर केला आहे.

विद्यापीठातील पीएच. डी. विभागात बायोकेमिस्ट्री, मायक्रोबॉयलॉजी, भूगोल, गणित, वृत्तपत्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, संगणक, अभियांत्रिकी आदी विषयांतील विद्यार्थ्यांची बहुतांश कामे प्रलंबित आहेत. यामध्ये प्राध्यापकांना पीएच. डी. गाईडशिप देणे, पीएच.डी.चा अंतिम गोषवारा मंजूर करून पॅनल देणे, पीएच.डी.च्या विषयात किरकोळ बदल करणे, अशा  कामांचा समावेश आहे. दिरंगाईमुळे कामाकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना  अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी अधिष्ठातांच्या समोरच केला. वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विषयात सर्व प्रकारची कामे पूर्ण झाली आहेत. या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे तात्काळ विद्यार्थ्यांची कामे मार्गी लावतात. तेव्हा उर्वरित अधिष्ठाता विद्यार्थ्यांची अडवणूक का करतात? असा सवालही  उपस्थित करण्यात आला.

यावेळी डॉ. सरवदे यांनी अधिष्ठातांची बाजू सांभाळत विद्यार्थ्यांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या प्रश्नांना अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी, डॉ.संजीवनी मुळे यांना उत्तरेही देता आली नाहीत. सदस्य आक्रमक झाल्यामुळे प्रकुलगुरू  डॉ. अशोक तेजनकर यांनी  हस्तक्षेप करून पीएच.डी. विभागांच्या उपकुलसचिवांना बोलावून घेऊन आगामी दोन दिवसांत प्रलंबित विषय अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत ठेवण्याची सूचना केली. तसेच विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या विभागप्रमुख, अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनाही नियमानुसार पत्र पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गाईडशिप देणे शक्य नसेल, तसे कळवाभूगोल विषयात काही प्राध्यापक गाईडशिपसाठी पात्र आहेत. मात्र त्या विषयाच्या अभ्यास मंडळाचा अध्यक्ष जाणीवपूर्वक प्राध्यापकांना गाईडशिप मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. संबंधित प्राध्यापकांना नियमानुसार गाईडशिप देणे शक्य नसेल, तसे लेखी लिहून द्यावे, अशी मागणी आहे. अन्यथा न्यायालयाचा पर्याय निवडावा लागेल.- डॉ. फुलचंद सलामपुरे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

येत्या दोन दिवसांत अधिष्ठाता मंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येतील. ज्या विषयांचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक करत आहेत, त्यांच्या ऐवजी इतर तज्ज्ञांना बोलावून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील.- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी