शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे ‘फार्म डी’ची मान्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 18:31 IST

राज्यात केवळ दोन शासकीय महाविद्यालयांतच अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी 

ठळक मुद्देफार्मसीच्या विद्यार्थ्यांना फटकाविनामान्यता प्रवेश प्रक्रियेत सहभागी करता येणार नाही.

औरंगाबाद : राज्यातील दोन शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सुरू असलेला डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म डी) हा अभ्यासक्रम यावर्षी औरंगाबादच्यामहाविद्यालयात रद्द करण्यात आला आहे. आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात ‘एआयसीटी’ आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच ‘पीसीआय’ या सर्वोच्च संस्थांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यास बंदी घातली. यामुळे चालू प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या महाविद्यालयाची एकही जागा दाखविण्यात येत नाही.

औरंगाबाद येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात फार्म डी. हा सहा वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम २०११ पासून शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचीही पसंती आहे. मात्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह तंत्रशिक्षण विभागाने वेळोवेळी या अभ्यासक्रमाची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. नियोजित वेळेत शिक्षकांची नेमणूक, औषधनिर्माण केंद्राची निर्मिती, फार्मसी प्रॅक्टिस विभाग, आवश्यक त्या सॉफ्टवेअरची खरेदी करण्यात आलेली नाही. याविषयीचा अहवाल केंद्रीय पातळीवरील ‘एआयसीटी’ आणि ‘पीसीआय’ संस्थेकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे ‘पीसीआय’ने २९ एप्रिल २०१९ रोजी पत्र पाठवून आगामी वर्षात प्रवेश करायचे असतील तर संबंधित बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली.

मात्र, त्याकडेही महाविद्यालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ‘एआयसीटी’ची मान्यता मिळाली नाही. याचा परिणाम ‘सीईटी’ सेलमार्फत सुरू असलेल्या आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयाला सहभाग घेता आला नाही. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करताना औरंगाबादच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयासमोर एकही जागा दाखविण्यात येत नाही. शासकीय महाविद्यालयात कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकत होते. मात्र, महाविद्यालयात प्राचार्य, तंत्रशिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे हा प्रसंग उद्भवला असल्याचा आरोप फार्म डी. संघर्ष समितीचे विद्यार्थी रामप्रसाद नागरे यांनी केला आहे. तसेच २०११ पासून ‘एआयसीटी’, ‘पीसीआय’कडे खोटी माहिती देणाऱ्या तत्कालीन प्राचार्य डॉ. एस. एस. खडबडी, प्राचार्य डॉ. व्ही. के. मौर्य,  फार्म डी. समन्वयक डॉ. एस. बी. बोथरा, अधिकारी डॉ. साधना शाही यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्याकडे केली आहे.

‘एआयसीटी’, ‘पीसीआय’च्या मान्यता मिळाल्या नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत फार्म डी. अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला नाही. या अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत मिळाल्या तरी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. मात्र विनामान्यता प्रवेश प्रक्रियेत सहभागी करता येणार नाही.- डॉ. महेश शिवणकर, सहसंचालक

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादcollegeमहाविद्यालय