शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतील नोकरीच्या आमिषाने १९ लाख ८० हजारांचा आॅनलाईन गंडा

By admin | Updated: August 6, 2016 00:23 IST

औरंगाबाद : शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्यांना आॅनलाईन फसविण्याचे प्रकार सुरूच आहेत.

औरंगाबाद : शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्यांना आॅनलाईन फसविण्याचे प्रकार सुरूच आहेत. मोठ्या पगाराची नोकरी देण्याच्या आमिषाने एका उच्चशिक्षित महिलेस १५ लाख रुपयांचा आॅनलार्इंन गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन भामट्यांना पकडून आणण्यात पोलिसांना यश आले होते. ही घटना ताजी असतानाच दुबईत मोठ्या पगाराची नोकरी आणि अ‍ॅडव्हान्स ५० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून शहरातील एकाला १९ लाख ८० हजार ५०५ रुपयांना आॅनलाईन लुबाडण्यात आले. याप्रकरणी जवाहनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले की, आदित्य वळसंगकर (रा.मयूरबन कॉलनी ) यांना २७ एप्रिल रोजी एक मेल प्राप्त झाला. यात दुबईस्थित अमेरिकन हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठीचा तुमचा अर्ज मान्य झाला असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच या मेलमध्ये त्यांना या नोकरीमध्ये ४६ हजार ५०० रुपये दरमहा वेतन आणि ५० लाख रुपये अ‍ॅडव्हान्स वेतन म्हणून देण्यात येणार असल्याचे नमूद केले. व्हिसाच्या प्रक्रियेचा खर्च मात्र आदित्य यांना करावा लागेल तसेच नोकरीच्या काळातील (पान १ वरून)दुबईत राहण्याचा खर्च कंपनीतर्फे केला जाणार असल्याचे म्हटले होते. या अटी मान्य असतील तर त्यांनी दिलेल्या ई-मेल आणि मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी त्या कंपनीकडे व्हिसासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांची आॅनलाईन मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी निवड झाल्याचे त्यांना कळविण्यात आले. १० मे रोजी त्यांना व्हिसासाठी लागणारी फीस म्हणून ९२ हजार ५०५ रुपये भामट्यांनी सांगितलेल्या पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात त्यांनी भरले. त्यानंतर कंपनीने त्यांना ५० लाख रुपये अ‍ॅडव्हान्स पगाराचे बिल त्यांना मेलमार्फत पाठवले. ही रक्कम मिळवण्यासाठी दुबईतील अरब बँक येथे खाते उघडण्यास सांगितले. खाते उघडल्यानंतर बँकेत ही रक्कम जमा झाल्याची खात्री झाल्याने ही रक्कम सोडविण्यासाठी आरोपींनी त्यांना वेळोवेळी विविध बँक खात्यांत तब्बल १९ लाख ८० हजार ५०५ रुपये जमा करायला लावले. २८ जून रोजी कंपनीने त्यांना पुन्हा अडीच लाख रुपये जमा करण्याचे सांगितले. आदित्य यांनी रक्कम भरण्यास नकार देताच भामट्यांनी त्यांना जेलमध्ये डांबण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.