शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

खुलताबादमध्ये पोलिसांच्या छाप्यात घरातून ड्रग्ज जप्त; आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:33 IST

खुलताबाद शहरात एकच खळबळ; ६८ हजारांच्या अंमली पदार्थासह एक जण अटकेत

खुलताबाद : खुलताबाद पोलिसांनी शहरातील आडवडी बाजार परिसरातील गुलाब शहा कॉलनीमध्ये एका घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

खुलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे व बीट जमादार शेख जाकेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुलाब शहा कॉलनीत चोरीछुपे अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे समजले. त्यानुसार शुक्रवारी रात्री पोलिस निरीक्षक फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिनकर गोरे, शेख जाकेर, गवळी, सदावर्ते यांच्यासह न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे तज्ञ डॉ. किशोर गवळे, सहाय्यक रासायनिक विश्लेषक संदीप राठोड, आणि वैज्ञानिक सहाय्यक यांच्या मदतीने छापेमारी करण्यात आली.

शुक्रवारी रात्री ११:४५ वाजता पोलिस पथक गुलाब शहा कॉलनीत सय्यद इक्बाल याच्या घरासमोर पोहोचले. तेव्हा घरासमोर एक इसम संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव सय्यद बिलाल उर्फ इक्बाल सय्यद खलील (वय ३८) असे सांगितले. पोलिसांनी छाप्याचा उद्देश स्पष्ट केल्यावर त्याच्या घराची पंचनामा करून झडती घेण्यात आली.

झडती दरम्यान घरातील लोखंडी कपाटात लपवून ठेवलेली एक प्लास्टिक पिशवी सापडली. त्यामध्ये मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज असलेल्या आठ लहान प्लास्टिकच्या पुड्या आणि दोन पिवळ्या रंगाच्या Magnesium Sulphate IP च्या नऊ पुड्या आढळून आल्या. विचारणा केली असता त्या पदार्थांबाबत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र शेवटी ते ड्रग्ज असल्याचे कबूल केले.

जप्त केलेल्या अंमली पदार्थांची प्राथमिक तपासणी डॉ. किशोर गवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असून सखोल रासायनिक विश्लेषणासाठी त्या पुड्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. या कारवाईत एकूण ६८,४२० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सपोनि दिनकर गोरे यांच्या फिर्यादीवरून सय्यद बिलाल उर्फ इक्बाल याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर