शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चालक व वाहकाची बनवेगिरी झाली उघड; मित्रांच्या मदतीने चोरलेली १६ जनावरे,ट्रक पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 18:58 IST

पोलिसांनी लपवून ठेवलेली जनावरे आणि ट्र्क जप्त केला असून आरोपींच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. 

ठळक मुद्देपोलिसांसमोर नाही चालली बनवेगिरी स्थानिक गुन्हेशाखेची कामगिरी

औरंगाबाद: कट रचून मित्रांमार्फत १६ जनावरांचा ट्रक लंपास केल्यानंतर चोरट्यांनी मारहाण करून ट्रक हिसकावून नेल्याची माहिती वाहनमालकाला देणाऱ्या ट्रक चालक आणि वाहकाची बनवेगिरी पोलिसांसमोर टिकली नाही . पोलिसांनी आरोपी चालक आणि वाहकाला  अटक केली आणि त्यांच्या साथीदारांनी लिंबेजळगाव शिवारात लपवून ठेवलेली जनावरे आणि ट्र्क जप्त केला असून आरोपींच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. 

ट्रकचालक अमजद अहमद कुरेशी ( रा . बडा तकिया , नुतन कॉलनी) आणि वाहक मंगेश प्रल्हाद पोळ (रा . गवळीपुरा , छावणी) अशी आरोपींची नावे आहेत . याविषयी प्राप्त माहिती अशी की , अब्दीमंडी येथील आसाराम बाबाराव वरकड हे जनावरांचा व्यापार करतात . त्यांनी देवगाव रंगारी येथे १६ गायी आणि गोऱ्हे खरेदी केले होते . ही जनावरे घेऊन येण्याचे काम ट्रकमालक अब्दुल अमीन मोहम्मद खाजामिया यांना दिले होते . याकरिता ट्रक भाडे ही ठरले होते . अमीन यांचा ट्र्कचालक अमजद आणि क्लिनर मंगेश यांनी ३ जुलै रोजी रात्री जनावरे ट्र्कमध्ये भरली आणि ते दौलताबादकडे येत असतांना दिवशी पिंपळगाव फाट्याजवळ दुचाकीस्वार तीन जणांनी ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून मारहाण करून जनावरासह ट्रक नेल्याची माहिती  सकाळी ६ वाजता ट्रकमालक यांना कळविली . यानंतर अब्दुल अमीन यांनी सिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली . या घटनेची माहिती मिळताच स्थागुशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे , उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत , कर्मचारी विठ्ठल राख  , नवनाथ कोल्हे आणि कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेऊन चालक आणि क्लीनरची स्वतंत्र चौकशी केली. तेंव्हा ते वेगवेगळी माहिती आणि घटना सांगू लागले . पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावल्याने त्यांना खाक्या दाखविताच क्लीनर मंगेशने गुंह्याची कबुली देत त्याचा साथीदार सचिन तायडे याच्या सांगण्यावरून हा ट्रक त्याने आणलेल्या तीन जणांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले . 

२० हजाराच्या आमिषाला पडले बळीआरोपी सचिन तायडे याने ट्रक चालक आणि क्लीनर यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचे कबुल केले होते. २० हजाराच्या आमिषाला बळी पडून त्यांनी साडेचार लाखाची जनावरे आणि ११ लाखाचा ट्रक चोरांच्या स्वाधिन केल्याचे निष्पन्न झाले .

लिंबेजळगाव शिवारातून जनावरांसह ट्रक जप्त गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू करताच लिंबेजळगाव शिवारातील शेतात चोरट्याने जनावरे भरुन ट्रक आणून ठेवल्याची माहिती मिळाली . पोलिसांनी लगेच तेथे जाऊन पहानी केली असता आरोपीनी पळविलेला ट्रक आणि पशूधन असल्याचे स्पष्ट झाले . जनावरे आणि ट्रक जप्त केला .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस