शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू

By संतोष हिरेमठ | Updated: January 19, 2024 15:40 IST

मराठवाड्यातील रस्त्यांवर रोज ७ जणांचा बळी

छत्रपती संभाजीनगर : राज्यात रस्ते अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे. राज्यात अवघ्या ११ महिन्यांत ३० हजारांवर अपघात झाले असून, त्यात १३ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला. मराठवाड्यातील रस्त्यांवरही दररोज जवळपास ७ लोकांचा रस्ते अपघातात बळी जात आहे. अपघात आणि मृत्यूची संख्या पाहता वाहन चालविताना काळजी घेण्याची गरज आहे. तर शासनानेही अपघात प्रणवस्थळांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांतील अपघातांची तुलना करणारी २०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षांची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी पाहता २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. राज्यात २०२१ मध्ये २६ हजार ५३५ अपघात, १२ हजार १७० मृत्यू झाले. तर २०२३ मध्ये ३० हजार ८५७ अपघात आणि १३ हजार ५७९ मृत्यू झाले.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील अपघातवर्ष- अपघात- एकूण मृत्यू२०२१-५४०-३६५२०२२-६७५-४२८२०२३-७२५-४३५

छत्रपती संभाजीनगर शहरातील अपघातवर्ष- अपघात- एकूण मृत्यू२०२१- ४२७-१४३२०२२- ४७१-१८६२०२३- ५६८-१८७

मराठवाड्यात २०२३ मध्ये किती अपघात ?जिल्हा- अपघात- एकूण मृत्यूपरभणी-३९६-१९८लातूर- ७३१-३३९हिंगोली-३३७-१९०नांदेड-६३३-३४०बीड-७४०-४१५धाराशिव- ५९७-२६८जालना-५२८-३०५

राज्यातील स्थिती (२०२३)ठिकाण- अपघात- एकूण मृत्यूपुणे ग्रामीण-१७००-९६३मुंबई शहर - १२६३-२५२नवी मुंबई - ६९५-२१७नागपूर ग्रामीण -८४५-३६७नागपूर शहर-११०३-२७७पुणे शहर-११३२-३१६पिंपरी चिंचवड-१०९७-३३४नंदूरबार-२९१-१८४सातारा-८८४-४५१नाशिक शहर-४२६-१७१सोलापूर ग्रामीण-१११३-६११सोलापूर शहर- १७४-६९कोल्हापूर-१०६६-३७६नाशिक शहर-४२६-१७१जळगाव-८१७-४३२

अपघाताची काही कारणे- खराब रस्ता, धोकादायक वळण.- गुळगुळीत रस्त्यांवर वाहनांचा अतिवेग.- मद्यपान करून वाहन चालविणे.- वाहन चालविताना डुलकी लागणे.- नादुरुस्त वाहन चालविणे.- अनेक ठिकाणी तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लावणे कठीण.- दुचाकीचालकांची राष्ट्रीय महामार्गांवर वाढती संख्या.

हेल्मेट, सीटबेल्ट वापराछत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात काही प्रमाणात अपघात वाढले आहे. हे अपघात कमी करण्यासाठी विविध प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत. वाहनचालकांनी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करावा. मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद