शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

ड्रेनेज चेंबरमध्ये दीडवर्षीय चिमुकला पडला अन्....

By admin | Updated: September 28, 2016 00:48 IST

औरंगाबाद : फाजलपुरा भागात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ३० ते ४० वर्षांपूर्वी ३५० घरांची वसाहत उभारण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये मागील

औरंगाबाद : फाजलपुरा भागात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ३० ते ४० वर्षांपूर्वी ३५० घरांची वसाहत उभारण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये मागील काही दिवसांपासून तुंबलेले ड्रेनेज लाईन उघडेच होते. मंगळवारी सकाळी कार्तिक सुधीर साठे हा दीडवर्षीय चिमुकला ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडला. त्याला त्वरित बाहेर काढण्यात आले. मात्र, बेशुद्धावस्थेत कार्तिकला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. मनपाचे कर्मचारी सुधीर साठे यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईन मागील १५ दिवसांपासून तुंबली आहे. अनेकदा वॉर्ड कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साफसफाईसाठी टेंडर होणार आहे. चोकअप काढण्यासाठी निधी नाही, आदी कारणे सांगितली. ड्रेनेजचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने तुंबलेल्या चेंबरचे झाकण कोणीतरी उघडले. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता साठे यांचा दीडवर्षीय मुलगा कार्तिक घरासमोर खेळत ओता. अचानक कार्तिक ड्रेनेजच्या तुंबलेल्या चेंबरमध्ये पडला. काही सेकंदात आसपासच्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले. तोपर्यंत कार्तिकच्या नाका-तोंडात घाण पाणी गेले होते. त्याला लगेचच बेशुद्धावस्थेत खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.