शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात रॅकेटमध्ये डॉ. सुनील राजपूतचे कनेक्शन उघड; डॉ. आहेरला प्रत्येकी १५ हजारांची 'दलाली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:22 IST

सातारा गर्भपात रॅकेटमध्ये सहा वर्षे जुनेच रॅकेट सक्रिय, ९० हजारांपर्यंतचे ऑनलाइन व्यवहार पाहून पोलिसही चकित

 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह पुणे, ठाणे येथे सहा वर्षांपासून सातत्याने गर्भपाताच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या डॉ. सुनील राजपूतचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात उघडकीस आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटमधील पीडितेची तपासणी याच राजपूतने केल्याचे डॉ. विकास आहेरने जबाबात सांगितले आहे. पीडितेचा संदर्भ देण्यासाठी त्याला राजपूतने १५ हजार रुपयांचे कमिशन दिल्याचे ऑनलाइन व्यवहारातून उघडकीस आले आहे.

५ एप्रिल रोजी सातारा पोलिसांनी वर्षा बाबासाहेब जाधव व उज्ज्वला विठ्ठल गायकवाड या दोन बहिणींच्या घरात छापा टाकत गर्भपाताचे नवे रॅकेट उद्ध्वस्त केले. दोघी बहिणींकडे महिला रुग्ण पाठविणाऱ्या डॉ. आहेर (रा. निल्लोड, सिल्लोड) याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी आता आहेरचा मोबाइल जप्त केला असून, त्यातून धक्कादायक बाबी समजत आहेत. सातारा पोलिसांनी मंगळवारीही वर्षाची मैत्रीण ज्योती पवारचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले, निर्मला राख, नंदकुमार भंडारे अधिक तपास करीत आहेत.

धक्कादायक : राजपूत दुष्कर्मात अजूनही सक्रियच-शहरातील छावणी, वाळूज, पुंडलिकनगर तसेच ठाणे, पुणे येथे गर्भपाताचे गुन्हे दाखल असलेला डॉ. सुनील राजपूत अजूनही दुष्कर्मात सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. जून २०२३ मध्ये त्याला वाळूज पोलिसांनी अटक केली होती.-दीड ते दोन वर्षांपूर्वी डॉ. आहेरने स्वतःहून त्याच्याशी संपर्क साधला होता. त्याच्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची माहिती देऊन गर्भपाताबाबत विचारणा केली होती. त्यानंतर दोघांची भेटही झाली.-रविवारच्या कारवाईतील पीडितेच्या घरी जाऊन राजपूतने तपासणी करून मुलगी असल्याचे सांगितले. या रुग्णासाठी त्याने आहेरला १५ हजार रुपये कमिशन दिले.-त्यानंतर राजपूतने ज्योती पवारला सांगून महिलेला गर्भपातासाठी शहरात पाठवले.

९० हजारांपर्यंत ऑनलाइन व्यवहारपोलिसांनी आरोपींचे आर्थिक व्यवहार तपासणे सुरू केले आहे. वर्षा व ज्योती यांच्यात गेल्या काही महिन्यांत सातत्याने १०, १५, ३०, ४० हजार रुपयांचे ऑनलाइन व्यवहार आढळले. यात राजपूत, वर्षा, ज्योती व इतरांमध्ये ९० हजारांपर्यंत ऑनलाइन पैसे पाठवले गेले आहेत. वर्षाच्या घरात आढळलेला औषध व शस्त्रांचा साठादेखील ज्योतीनेच पुरवल्याची कबुली बहिणींनी दिली.

जुनीच टोळी सक्रिय, परिचारिकांवर लक्षजून २०२३ मध्ये राजपूतला अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत पूजा नावाची शासकीय परिचारिकादेखील गजाआड झाली होती. तेव्हापासून राजपूत परिचारिकांना हेरून पैशांचे आमिष दाखवून गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सहभागी करून घेई. वर्षा अद्यापही राजपूतला भेटली नसून व्हॉट्सॲपवरच संपर्कात राहिल्याचा दावा करते. यामुळे राजपूत व डॉ. सतीश सोनवणे यांची जुनीच टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय आहे.

सोनवणे पसारमार्च महिन्यात नारेगावमध्ये उघडकीस आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटमध्ये डॉ. सोनवणेचे नाव उघडकीस आले. त्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी तीन वेळा त्याच्या घराची झडती घेतली. मात्र, तो सापडला नाही. सोनवणेने जालन्यातील परिचारिकांनाही या दुष्कर्मात सहभागी करून घेतले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dr. Rajput's abortion racket link exposed; Dr. Aher got commission.

Web Summary : Dr. Sunil Rajput, a key figure in abortion rackets across Maharashtra, is again implicated. Dr. Aher confessed to receiving ₹15,000 commission from Rajput for patient referrals. Police are investigating financial transactions and suspect a network involving nurses and other doctors.
टॅग्स :Abortionगर्भपातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी