डॉ. शिवशंकर बत्रा मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास फिरायला जातो असे सांगून घराबाहेर पडले. तत्पूर्वी त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले होते. यातच ते फिरायला म्हणून गेले आणि परत आले नव्हते. सोबत त्यांनी मोबाईल आणि पैसे नेले नव्हते. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत असतांना बुधवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास डॉ. बत्रा यांनी बायपासवर एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरुन पत्नीला कॉल केला. यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यास गेले. डॉक्टरांच्या हाताला खरचटले आहे. चक्कर येऊन पडल्याने ते जखमी झाले अथवा अन्य काही कारणाने हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ते मंगळवारी दिवसभर आणि रात्री कोठे होते, बायपासवर कसे पोहोचले याविषयी ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांचा जबाब नोंदविता आला नाही, असे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले.
डॉ शिवशंकर बत्रा सुखरूप परतले
By | Updated: December 3, 2020 04:11 IST