शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

डॉ. राजन शिंदे खून प्रकरण : पाच दिवसांनंतरही खुनाचा उलगडा होईना; दोन संशयितांची तब्बल ६ तास चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 10:53 AM

Dr. Rajan Shinde murder case: खुनाची घटना घडली त्या रात्री डॉ. राजन शिंदे यांची गाडी ज्या ज्या मार्गावर फिरली त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांना अनेक नवीन माहिती जमा करण्यात यश आल्याची माहिती घराशेजारील विहिरीतील गाळ काढण्यासाठी महापालिकेची मदत घेण्यात

औरंगाबाद : डॉ. राजन शिंदे यांच्या खून प्रकरणाचा ( Dr. Rajan Shinde murder case ) पाचव्या दिवसांनंतरही उलगडा झालेला नाही. शुक्रवारी दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन संशयितांची तब्बल सहा तास चौकशी केली. या चौकशीतून पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. (  Dr. Rajan Shinde Murder not solved even after five days) 

डॉ. शिंदे यांचा पाच दिवसांपूर्वी राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास लावण्यासाठी शहर पोलीस जंगजंग पछाडत आहेत. अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचता येत नसल्यामुळे पोलिसांनी इतर पुरावे शोधण्याचे काम हाती घेतले आहे. खुनाची घटना घडली त्या रात्री डॉ. शिंदे यांची गाडी ज्या ज्या मार्गावर फिरली त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात येत आहेत. हे काम शुक्रवारीही सुरूच होते. आगामी काळात हे फुटेज महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे संबंधितांच्या सर्व्हरमधून सीसीटीव्हीचा डाटा डिलीट होण्यापूर्वी ते जमा करण्याची काळजी घेण्यात येत आहे. विविध मार्गावर शस्त्रे, कापडे शोधण्यात दोन पथके व्यस्त होती. डॉ. शिंदे यांच्या घराशेजारील विहिरीतील गाळ काढण्यासाठी महापालिकेची मदत घेण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेचे कर्मचारी आले नसल्यामुळे गाळ काढण्यास सुरुवात झाली नाही. वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दोन संशयितांची वेगवेगळ्या ॲंगलने तब्बल सहा तास चौकशी केली. त्यातूनही ठोस कोणताही निष्कर्ष निघाला नाही.

तीन डीसीपी, चार पीआयसह इतर फाैजफाटाडॉ. शिंदे यांच्या खुनाचा उलगडा करणे शहर पोलिसांसमोर आव्हानात्मक बनले आहे. शुक्रवारी शहरातील तीन पोलीस उपायुक्त चौकशीसाठी मैदानात उतरले होते. याशिवाय गुन्हे शाखेच्या निरीक्षकांसह मुकुंदवाडी, उस्मानपुरा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तपासाची एक बाजू सांभाळली. सातारा, मुकुंदवाडी, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांचेही विविध पथके तैनात केली आहेत. या खुनाच्या तपासासाठी १०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व पोलीस कार्यरत आहेत.

शुक्रवारी दहा तास कामया घटनेच्या तपासात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात आश्वासक कामे करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या पथकांनी १० तासांपेक्षा अधिक काम केले. मात्र, त्यातून ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याएवढे पुरावे मिळालेले नाहीत. तपास सुरूच आहे.- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

हेही वाचा : - डॉ. राजन शिंदे खुन प्रकरण : चौथा दिवसही पुराव्याविनाच; झुंबडा, उस्मानाबाद येथून पथक परतले- पत्नीच्या जबाबात विसंगती; डॉ. राजन शिंदे खुन प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ उस्मानाबादेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद