शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

दुप्पट भाव, तरी विक्रीत वाढ; सूरतहून रामाचे आठ लाख ध्वज छत्रपती संभाजीनगरात

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 19, 2024 14:45 IST

प्राणप्रतिष्ठा जवळ येताच ध्वजाचे तीन दिवसांत वाढले दुप्पट भाव

छत्रपती संभाजीनगर : ‘ध्वज पताका घर-घर लहराए, दीप जला गीत मंगल गाए’ असे गीत सध्या देशभरात गाजत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा महोत्सव होत आहे. या धार्मिक सोहळ्याला अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. यानिमित्त घराघरांवर श्रीरामाचा भगवा ध्वज लावण्यात येणार आहे, याकरिता व्यापारी सरसावले असून, सूरतहून सुमारे आठ लाख ध्वज जिल्ह्यात विक्रीसाठी आणण्यात आले आहे.

ध्वजावर श्रीराम, मंदिराचे चित्रसूरत येथून प्रिंट करून आलेल्या भगव्या ध्वजावर धनुर्धारी प्रभू श्रीरामचंद्र व पाठीमागील बाजूस अयोध्येतील मंदिराचे प्रिंट छापण्यात आले आहे. अशा ध्वजांना मोठी मागणी आहे.

चार प्रकारांतील ध्वजबाजारात दाखल झालेल्या ध्वजामध्ये २० बाय ३० इंच, ३० बाय ४५ इंच, ४० बाय ६० इंच व ६० बाय ९० इंच असे चार प्रकार आहेत. शहरात चार होलसेलर असून, शेकडो विक्रेते ध्वज विकत आहे. याशिवाय शहरातून जिल्हाभरात ध्वज विक्रीला गेले आहे.

तीन दिवसांत वाढले भाव२० ते २२ जानेवारी दरम्यान अयोध्येत प्राणप्रतिष्ठा महोत्सव होत आहे. यानिमित्त मंदिरांवर व घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात येत आहे. जसजशी प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची तारीख जवळ येत आहे. तसतसे बाजारात ध्वजाला मागणी वाढत आहे. मागील तीन दिवसांत ध्वजाचे भाव दुप्पट, तीनपट्टीने वाढले आहेत. २० बाय ३० इंचचा ध्वज मंगळवारी २० रुपयांना मिळत तो बुधवारी ३५ रुपये व आज ६० रुपयांना विकला जात होता. ३० बाय ४५ इंच ध्वज तीन दिवसांपूर्वी ३५ रुपयांना मिळत तो आज ९० रुपयांना विकत होता. ४० बाय ६० इंच ध्वज ६५ रुपयांहून थेट १४० रुपये, तर ६० बाय ९० इंचाचा ध्वज बुधवारी १४० रुपये होता. आज २५० रुपये भाव करण्यात आला.

सुरतहून पुरवठा कमीहोलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, सुरतहून देशभरात ध्वज विक्रीला पाठविले जात आहे. ध्वजाला प्रचंड मागणी, पण उत्पादन कमी आहे. यामुळे ध्वज पुरवठ्यात तुटवडा जाणवत आहे. यामुळे किमती वाढत आहेत.

पहिल्यांदा ध्वजाला प्रचंड मागणीमागील २० वर्षांपासून मी हंगामी व्यवसाय करीत आहे. मात्र, यंदा श्रीरामाच्या ध्वजाला प्रचंड मागणी आहे. यापूर्वी कोणत्याच झेंड्याला एवढी मागणी नव्हती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा बदल नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ध्वज आणल्यावर हातोहात ध्वजाची विक्री होत आहे. ध्वजासोबत काठीलाही मागणी आहे. मागील तीन दिवसांत मी ५०० ध्वज विकले. आणखी ५०० ध्वजांची आर्डर दिली, पण आज २०० ध्वज होलसेलरकडून मिळाले. - विक्रांत अकोलकर, व्यावसायिक

टॅग्स :Ayodhyaअयोध्याAurangabadऔरंगाबाद