शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

औरंगाबादकरांवर दुहेरी संकट; कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:33 IST

कोरोनाच्या विळख्यात 'सारी'ने बळी जाण्याचे प्रमाण अधिक

ठळक मुद्देकोरोनासोबत सारीचे थैमान१० दिवसात सारीचे ११ बळी

औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात सारी'चे (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) संकट वाढत आहे. कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण आढळून येत आहे. शहरात कोरोनापेक्षा सध्यातरी सारीने बळी जाणाऱ्यांची संख्या अधीक असल्याने वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे. 

शहरात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. आतापर्यंत एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे एकच चिंता व्यक्त होत आहे. मात्र, सध्या कोरोना एवढ्याच 'सारी' जिल्ह्यासाठी संकट ठरत आहे. शहरात २४ मार्च रोजी कोरोनासदृश्य सारीने एकाचा मृत्यू झाल्याचे समोरे आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. परंतु त्यांनतरही सारीच्या रुग्णांचा बळी जाणे सुरूच आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रनेचे सारीकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना आणि सारीची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी केली जात आहे. ही चाचणी निगेटिव्ह येताच सुटकेचा निःस्वास सोडला जात आहे. 

मात्र, निगेटिव्ह अहवाल आलेले सारीचे रुग्णही मृत्युमुखी पडत आहे. याकडे आरोग्य विभागाने गंभीरतेने पाहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाचे १७ रुग्ण आढळून आले. मात्र, एका कोरोनाच्या मागे पाच सारीचे रुग्ण आढळत असल्याने काळजी व्यक्त होत आहे. सारीच्या रुग्णांच्या संख्याने आजघडीला शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू या आजाराने २९ मार्च ते ७ एप्रिल या १० दिवसात ११ जणांचे बळी घेतले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. यात १० जनांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह होता. तर एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ही संख्या आता १२ वर गेल्याचे गुरुवारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. या कारणाने होतो सारी एकदम सर्दी, तापाचे प्रमाण जास्त , खूप अशक्तपणा , निमोनिया, श्वसन दाह, छातीत दुखणे, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे आदी सारीचे लक्षणे आहेत. हा श्वसन मार्गाचा गंभीर आजार आहे. यात फुफ्फुसात पाणी (एआरडीएस), काही भागाला सूज येते. विषाणू, जिवाणू आणि बुरशीमुळे याला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांना आहे सर्वाधिक धोका सरीचा लहान मुले आणि जेष्ठ नागरिक , प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती, मधुमेह, ह्रदयरोग आलेल्या रुग्णांना सारीचा सर्वाधिक धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

प्रमाण वाढले सारीचे प्रमाण सध्या वाढले आहे. श्वसन संस्थेचा गंभीर आजार म्हणून सारीकडे पाहिले जाते. विषाणू, जिवाणू आणि बुरशीमुळे सारी होऊ शकतो. फुफ्फुसात पाणी होते. काही भागावर सूज येते. दमन लागत असल्याने रुग्णाला बोलताही येत नाही. त्यामुळे ऑक्सिजन द्यावे लागते.- डॉ. गजानन सुरवाडे, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग, घाटी

गंभीरतेने घ्यावे लागेल कोरोनासारखी लक्षणे मात्र, तपासणी अहवाल निगेटिव्ह येणारा रुग्ण हा सरीचा म्हटला जातो. सध्या एका करोनाच्या रुग्णामागे सारीचे पाच रुग्ण आढळत आहे. सारीचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. याला गंभीरतेने घेतले पाहिजे.- डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, औरंगाबाद 

फिजिशियन असोसिएशन वेळीच लक्ष द्यावे आयसीयूमध्ये कोरोना संशयित रुग्ण असतो. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर सारीचा रुग्ण म्हणून उपचार केला जातो. दम लागणे, ताप येणे, थकवा येणे, जुलाब आशा गोष्टीकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. - डॉ. आनंद निकाळजे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद