शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

घरा-घरात लँडलाइन फोन पुन्हा खणखणणार; इंटरनेट सुविधा घेऊन आला बीएसएनएल फोन

By साहेबराव हिवराळे | Updated: October 6, 2023 18:54 IST

पुन्हा कात टाकण्याचे बीएसएनएलचे प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : अनेक घरांत शोपीससारखे पडलेले जुने लँडलाइन फोन पुन्हा खणखणणार आहेत. पुन्हा कात टाकण्याचे बीएसएनएलचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. फायबर कनेक्शन जोडणीतून मनसोक्त बोलता येईल. ओटीटीवर चित्रपटासह टीव्ही पाहता येईल. डाटा, इंटरनेट सुविधा घेऊन बीएसएनल फोन नव्या रुपड्यात येत आहे.

खासगी कंपन्यांच्या गतिमान कारभाराच्या स्पर्धेत बीएसएनएल गुदमरले होते. कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आऊटसोर्सिंग यंत्रणेला ग्राहक सेवा केंद्र देण्यात आले आहे. पूर्वी कर्मचारी संख्या घटल्याने बीएसएनएलची नेटवर्क सेवा कमी पडत होती. आता शासनाने बीएसएनएलची यंत्रणा गतिमान केली असून, ४ जी, ५ जी देण्यावर भर दिलेला आहे.

छत्रपती संभाजीनगरात १० हजारांवर जोडण्या घेण्यात आलेल्या आहेत. वायफाय, इंटरनेट डाटा, ओटीटीवर टीव्ही, सिनेमा, मालिका, यू-ट्यूबवरील व्हिडिओ देखील पाहता येतील. फोनवर अमर्याद कॉलिंग सेवा अशा योजनांसह घरातील टेलिफोन खणखणणार आहे.

२६ ग्राहक सेवा केंद्रांवर ही सेवा सुरू...जुन्या बंद पडलेल्या फोनचे पुनरुज्जीवन करता येईल. नेटवर्क गतिमान झाल्याने घरातील फोनसह साधारण पाच मोबाइलच्या जोडण्यांचा लाभ घेता येणार आहे. घरातील कुुटुंबात इंटरनेटचा वापर वाढत आहे. अभ्यास असो की मनोरंजन वा व्यवसाय; सर्वांसाठीच फोनचा उपयोग सुरू आहे. बीएसएसएलच्या भारत नेटवर्कचा कारभार सर्वांनाच सोयीचा ठरणार आहे. आधारकार्डसह इतर सेवांचा जनतेने लाभ घ्यावा.- संजयकुमार केशरवानी, जी.एम. बीएसएनएल

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBSNLबीएसएनएलInternetइंटरनेट